गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने येरवडा येथील पोल्ट्री फार्म वर दरोड्याचा तयारीत असलेल्या टोळीला ठोकल्या बेड्या - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Thursday, 17 September 2020

गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने येरवडा येथील पोल्ट्री फार्म वर दरोड्याचा तयारीत असलेल्या टोळीला ठोकल्या बेड्या

येरवडा येथील पोल्ट्री फार्म, चिकन सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने पकडले. रिक्षाचालकाला भाडे असल्याचे भासवून त्याला निर्जन स्थळी नेऊन लुटण्याचा प्रकार या तिघांनी केल्याचे उघडकीस आले आहे.
दिलीप विठ्ठल भोई (रा. जळगाव), राज्या ऊर्फ विकास सिताराम लांडगे ( रा.बोरीवली, मुंबई) आणि विकास दिलीप कांबळे (रा.सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.त्यांचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पथकाला येरवडा येथील संगमवाडीकडे जाणाऱ्या चौकात ४ जण संशयास्पदरित्या थांबले असल्याची माहिती मिळताच. त्यांना त्या ठिकाणावरून पकडण्यात यश आले. त्यांची झडती घेतली असता २ कोयते, १ चाकू व नायलॉनची दोरी इत्यादी सामान जप्त करून त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशीत त्यांनी सादलबाबा दर्ग्याजवह योजना पोल्ट्री फार्मला रविवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे पोल्ट्री फार्म बंद झाल्यावर त्याच्या कॅश काऊंटरवर दरोडा टाकण्याचा बेत होता, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी चौघांनाही अटक केली असून न्यायालयाने त्यांना १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय झंजाड, सहायक फौजदार अब्दुल करीम सय्यद, भालचंद्र बोरकर, गणेश साळुंके, शितल शिंदे, सुरेंद्र साबळे, राकेश खुणवे, निलेश शिवतरे व सुहास कदम यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad