पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची बदली, अमिताभ गुप्ता नवे पोलीस आयुक्त - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Friday, 18 September 2020

पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची बदली, अमिताभ गुप्ता नवे पोलीस आयुक्त

पुणे माझा न्यूज :पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची बदली झाली असून त्यांच्या जागी अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रात्री उशिरा राज्य शासनाच्या गृहविभागाने बदलीचे काढले आहेत. पुणे पोलीस दलात सूसत्रीकरण आण्यासोबतच काही अभिनव उपक्रम राबविल्यामुळे डॉ. व्यंकटेशम यांचा कारकीर्द चांगलीच गाजली. 




डॉ. के. व्यंकटेशम यांची अप्पर पोलीस महासंचालक (विशेष अभियान), महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.


नवे आयुक्त अमिताभ गुप्ता हे मुंबईला मंत्रालयात गृहखात्याचे प्रधान सचिव (विशेष) म्हणून कार्यरत होते. त्यांची पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात वादग्रस्त वाधवान कुटुंबाला खंडाळा ते महाबळेबश्वर अशा प्रवासाची परवानगी दिल्यामुळे गुप्ता यांचे नाव देशभर चांगलेच गाजले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुप्ता यांना शासनाने काही दिवस सक्तीच्या रजेवर पाठवले होते.


पुण्याच्या पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. व्यंकटेशम यांनी अनेक नवीन उपक्रम सुरू केले. तर कित्येक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या तक्रारींचा निपटारा देखील केला. यामुळे अनेक वर्षांपासून उगाच भरमसाठ वाढणाऱ्या गुन्ह्यांची आकडेवारी झपाट्याने कमी झाली. त्यांनी सुरू केलेली टीआरएम मिटिंग पुण्यासोबतच पूर्ण राज्य पोलीस दलात सर्वाधिक गाजली.  त्यांच्या या बैठकीचे पुणेकरांकडून कौतुक झाले.


पुणे पोलिसांचा “सेवा” उपक्रम राज्य पोलीस दलात गाजला गेला. सेवा उपक्रमाचा सर्वाधिक लाभ तक्रारदार आणि त्यानंतर पोलिसांना देखील झाला. यामुळे कोणाचे काम तर अडले नाहीच, पण तक्रारीचा निपटारा देखील लवकर झाला.  अनेक वर्षांपासून एकाच पदावर ठाण मांडून बसलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून डॉ. व्यंकटेशम यांनी पोलीस खात्याची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला. डॉ. व्यंकटेशम यांनी पुण्यातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कडक पावले उचलली. त्यांच्यामुळे प्रथमच वाहतूक विभागाला अप्पर आयुक्त दर्जाचा अधिकारी मिळाला. त्यांच्या कार्यकाळात बेशिस्त वाहनचालकांकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Top Ad