कोंढव्यात आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली; अवजड वाहनांची अवैध वाहतूक सुरूच
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : पुण्यातील कोंढवा परिसरातून एक गंभीर बातमी समोर येत आहे, जिथे पोलीस आयुक्तांच्या स्पष्ट आदेशाला धाब्यावर बसवत अवजड वाहनांची अवैध वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे.
स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, कोंढवा वाहतुकीचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे हे कर्तव्य दक्ष अधिकारी यांच्या कार्यकाळात त्यांनी अशा समस्यांवर तोडगा काढून ट्रॅफिक मुक्त कोंढवा करण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत आता पुन्हा कोंढव्यातील मुख्य रस्त्यांवर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवजड वाहने धावताना दिसत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच, शिवाय रस्त्यांची दुरवस्था आणि अपघातांचा धोका वाढला आहे. विशेषतः कोंढवा रोडवरील अरुंद रस्ते आणि अनधिकृत पार्किंगमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. स्थानिकांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या, परंतु वाहतूक पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
आयुक्तांनी अवजड वाहनांवर बंदी घातली आहे, पण दिवस आणि रात्री ओपन फाळके, ट्रक आणि डंपर रस्त्यावर धावत आहेत याकडे कोंढवा वाहतुकीचे पोलीस कर्मचारी कारवाई करताना हात वर केले जात आहे
सूत्रांनुसार, कोंढव्यातील अवैध वाहतुकीमागे स्थानिक वाहतूक पोलिसांची उदासीनता आणि काही प्रकरणांमध्ये साटेलोटे असल्याचा संशय आहे. यापूर्वी, डिसेंबर 2024 मध्ये अलिबाग येथे वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी अवजड वाहनांवर दोन दिवसांची बंदी घालण्यात आली होती, ज्याला यश मिळाले होते. मात्र, कोंढव्यात अशा उपाययोजनांचा अभाव दिसून येत आहे. स्थानिकांनी आता प्रशासनाकडून सीसीटीव्ही कॅमेरे, नियमित गस्त आणि कडक दंडात्मक कारवाईची मागणी केली आहे.
कोंढव्यासारख्या व्यस्त परिसरात आयुक्तांचे आदेश डावलून अवैध वाहतूक सुरू राहणे हे चिंताजनक आहे. प्रश्न असा आहे की, ज्या वाहतुकीच्या समस्या आहेत त्यावर मार्ग न काढता पोलीस कर्मचारी जर दुर्लक्ष असतील तर ट्रॅफिकच्या या समस्येवर कधी आणि कशी कारवाई होणार? येथील स्थानिक नागरिक प्रश्न करत आहेत
No comments:
Post a Comment