बोपदेव घाटात सुरक्षेसाठी पोलिसाला नेमले.! मग काय तो नागरिकांना लुटायला लागला, कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल तर तडकाफडकी निलंबित
पुणे माझं न्युज । प्रतिनिधी : पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात पुण्यातील बोपदेव घाटात फिरायला जातात. त्या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी अनुचित प्रकार घडल्याने पोलीस चौकी स्थापित करण्यात आली आहे याचे मूळ कारण म्हणजे त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राहावी या करीता चौकीचे निर्माण करण्यात आले परंतु याचा गैर फायदा पोलीस कर्मचारी घेताना दिसत आहेत म्हणजेच या ठिकाणी एका तरूणांकडून पोलीस कर्मचाऱ्याने खंडणी घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणांना भीती दाखवून पोलिसाने पैसे उकळ्याची बातमी समोर आली आहे आहे. नेमकं प्रकरण काय? बोपदेव घाटात सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने चक्क नागरिकांकडून खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणांची अडवणूक करून पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत. हा तरुण मित्रासोबत फिरण्यास गेला होता. त्यावेळी त्या तरुणाच्या बॅगेत हुक्का पॉट आढळल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने कारवाईची करण्याची धमकी देत तरूणांकडून 28 हजार रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार घडला आहे.
या पोलीस रक्षकाचे ( भक्षक ) नाव विक्रम लक्ष्मण वडतीले असे या पोलिसाचे नाव आहे. तक्रारदार तरुण, जो चेन्नईचा रहिवासी आहे, त्याच्या बॅगेत हुक्का पॉट सापडल्यावर वडतीले याने कारवाईची धमकी देत 30 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर 28 हजार रुपये गुगल पे द्वारे स्वीकारले. या घटनेनंतर तरुणाने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यामुळे वडतीले याच्यावर गुन्हा नोंदवला गेला आणि त्याला तातडीने निलंबित करण्याची कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी केली आहे.
हा प्रकार पुणे पोलिस खात्याच्या विश्वासार्हतेला धक्का देणारा आहे. बोपदेव घाटासारख्या ठिकाणी, जिथे तरुण-तरुणी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येतात, तिथे अशा घटना घडणे चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाई करत निलंबनाची त्वरित कारवाई केली असली, तरी यापुढे अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.
No comments:
Post a Comment