कोंढवा पोलीस ठाणे अंतर्गत खूनाच्या गुन्हयातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा…
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : कोंढवा पोलीस ठाणे अंतर्गत खूनाच्या गुन्हयातील आरोपी सुरज सुनिल फाळके व मयत अमोल खडके हे दोघे ईनोफ्लेक्स लॅमिनेटर्स प्रायव्हेट लिमीटेड, कोंढवा बुद्रुक, पुणे या कंपनीमध्ये नोकरी करत होते. सदर घटना दिनांक २६/१०/२०२१ रोजी सकाळी ०५:३० वाजताचे सुमारास सर्व्हे नं. २६ / ए, कोंढवा बुद्रुक, पुणे येथील ईनोफ्लेक्स लॅमिनेटर्स प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर यातील मयत अमोल खडके हा झोपेत असताना घडली आहे. यातील मयत अमोल खडके हा सदर कंपनीमध्ये झोपलेला असताना आरोपी सुरज सुनिल फाळके याने जुन्या भांडणाच्या कारणावरुन मशिनच्या जड लोखंडी रॉडसारख्या पार्टने अमोल खडके याच्या डोक्यामध्ये वार करुन त्यास जिवे ठार मारले. सबब कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्रमांक ९३६/२०२१ भा.दं.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास श्री. संदिप मधाळे, सहा. पोलीस निरीक्षक, सध्या नेमणूक वाहतूक शाखा, पुणे शहर यांनी केला व यातील आरोपीविरुद्ध मा. न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले. सदर केसचा सेशन केस क्र.२५५/२०२२ असा आहे.
वरील प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपीस दिनांक ०६/०५/२०२५ रोजी सश्रम कारावासासह जन्मठेप व २० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी वकील श्री. राजेश कावेडिया, कोर्ट पैरवी १) सपोफौ श्री. महेश जगताप व २) पोहवा ३३६२ माने यांनी कामकाज पाहिले. सदर कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से), पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांनी नमूद गुन्ह्याचे तपासी अधिकारी श्री. संदिप मधाळे व कोर्ट पैरवी १) सपोफौ श्री. महेश जगताप व २) पोहवा ३३६२ माने यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.
No comments:
Post a Comment