प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा दाबून हत्या; राजगड पोलीसांची दमदार कामगिरी
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी: अज्ञात इसमाचा मौजे सारोळा गावचे हददीत निरा नदीच्या पात्रात पोत्यात हात पाय बांधलेला मृतदेह आढल्याने सदर अज्ञात मृतदेहाची शर्टाच्या टेलर टॅग वरून ओळख पटवुन अज्ञात मृतदेह याची ओळख पटवुन अज्ञात आरोपींना राजगड पोलीसांनी केले ८ तासात जेरबंद. यातील हकीकत दि.०९/०३/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. चे पुर्वी मौजे सारोळा, ता. भोर, जि. पुणे गावचे हद्दीतील नानाची वाडी नावाचे हॉटेलच्या कडेस निरा नदीच्या पात्रात एक अनोळखी पुरुष जातीच्या सुमारे ३० ते ३५ वर्षे वयाच्या अनोळखी इसमाचा कोणीतरी अज्ञात इसमाने कोणी तरी अज्ञात कारणावरून कशाचे तरी सहाय्याने गळा आवळुन, खुन करून, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने, त्याचे हात व पाय बांधून, त्यास पांढरे, पिवळे व लाल रंगाचे प्लॅस्टिकच्या पोत्यात घालुन, निरा नदी पात्रात फेकुन दिले आहे. वगैरे मजकुराचे फिर्यादीने यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक ०९/०३/२०२५ रोजी राजगड पोलीस स्टेशन गु.र.नं. १०२/२०२५ भारतीय न्याय संहिता (बी. एन. एस.) २०२३ कलम १०३ (१), २३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा तातडीने उघडीस आणुन कारवाई करण्याच्या सुचना मा. पंकज देशमुख सो., पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार सो. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, श्री. तानाजी बरडे सो., उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर विभाग, सासवड, पुणे ग्रामीण यांनी राजगड पोलीसांना दिल्या. श्री. राजेश गवळी, पोलीस निरीक्षक तसेच राजगड पोलीस स्टाफ यांनी मौजे सारोळा, ता. भोर, जि. पुणे गावचे हद्दीतील नानाची वाडी नावाचे हॉटेलच्या कडेस निरा नदीच्या पात्राजवळ घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर मृतदेहाची पाहणी करून श्री. राजेश गवळी, पोलीस निरीक्षक यांनी ०२ तपास पथके तयार करून तपासाची चक्रे जलदगतीने फिरवुन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सक्त सुचना पोलीस स्टाफ व डी बी टिम ला दिल्या. सदर गंभीर गुन्हयातील मयतएक अनोळखी पुरुष वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे याची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान होते. तसेच गुन्हा करणारे आरोपी यांनी कोणतेही धागेदोरे व पुरावा मागे न ठेवता केलेला सदरचा गंभीर गुन्हा याची उकल करण्याचे मोठे आव्हान राजगड पोलीसांसमोर उभे असताना राजगड पोलीसांनी मयत बॉडी चे अंगात घातलेल्या शर्टाच्या टेलर टॅग वरून व मयताचे उजवे हातावर असणा-या गोदनावरून तपासाची चक्रे जलद गतीने फिरवुन मतयाची ओळख पटवली. सदर टेलर टॅग हे लोहारा जिल्हा उस्मानाबाद येथील असल्याचे पोलीसांना समजले असता पोलीसांना मयताचे नाव सिध्देश्वर बंडु भिसे वय – ४० वर्शे सध्या रा. ससाणेनगर, गल्ली नंबर ४, शिवाजी महाराज पुतळयाजवळ, हडपसर पुणे मुळ रा. वडगाववाडी ता. लोहारा जि. धाराशिव असे असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झालेने सदरचा गुन्हा करणारे आरोपीपर्यत पोहचुन गुन्हयातील आरोपी नामे १) योगिता सिध्देश्वर भिसे वय – ३० वर्शे सध्या रा. ससाणेनगर, गल्ली नंबर ४, शिवाजी महाराज पुतळयाजवळ, हडपसर पुणे मुळ रा. वडगाववाडी ता. लोहारा जि. धाराशिव, २) शिवाजी बसवंत सुतार वय-३२ वर्शे रा. अंदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना ताब्यात घेवुन जेरबंद केले आहे.
सदरचे खुनाच्या गुन्हयातील मयत नामे सिध्देश्वर बंडु भिसे वय – ४० वर्षे हा त्याची पत्नी योगिता सिध्देश्वर भिसे व तिचा प्रियकर शिवाजी बसवंत सुतार यांचे असलेले अनैतिक प्रेम संबंधामध्ये अडथळा निर्माण करत असल्याचे कारणावरून आरोपी यांनी संगणमताने मिळण दिनांक ०३/०३/२०२५ रोजी हडपसर येथील राहते घरी मयताचा गळा हाताने आवळुन मयताचा खून करून त्याचे हात-पाय हे साडीच्या चिंधीने बांधुन मयत बॉडी एका प्लॅस्टिकचे पोत्यात भरून ती दुचाकीवरून घेवुन जावून मौजे सारोळा ता. भोर जि. पुणे येथील निरा नदीच्या पात्रात फेकुन दिल्याचे तपासात निश्पन्न झाले आहे.
सदर गंभीर स्वरूपाच्या खुनाच्या गुन्हयाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान राजगड पोलीसांनी स्विकारून सदरचा गुन्हा हा मा. पंकज देशमुख सो., पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा. गणेश बिरादार सो., अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, श्री. तानाजी बरडे सो., उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर विभाग, सासवड, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राजेश गवळी पोलीस निरीक्षक, श्री. अजित पाटील पोलीस उपनिरीक्षक, श्रीमती वृशाली देसाई पोलीस उपनिरीक्षक, पो. हवा. नाना मदने ब.नं. २३२०, पो.हवा. मयूर निंबाळकर ब.नं. २३१७, पो.हवा.सागर कोंढाळकर ब.नं. २४४२, पो.कॉ. अक्षय नलावडे ब.नं. २९२०, पो.कॉ. सचिन नरूटे ब.नं.२२७०, पो. कॉ. अनिकेत गुरव ब.नं. ३४६, पो.कॉ.समीर भालेराव ब.नं. २९३७, पो.कॉ.मगेश कुंभार ब.नं. २७३७ मपोशि चव्हाण ब.नं. ६५१ यांनी गुन्हा • उघडीस आणुन सदरची उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
No comments:
Post a Comment