Hadapsar Assembly election 2024: हडपसरच्या राजकारणात मोठी घडामोड; मतदानाच्या चार दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या माजी आमदाराचा मोठा निर्णय - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Monday, 18 November 2024

Hadapsar Assembly election 2024: हडपसरच्या राजकारणात मोठी घडामोड; मतदानाच्या चार दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या माजी आमदाराचा मोठा निर्णय

गंगाधर हेच महादेव बाबर आणि गंगाधर हेच शक्तिमान आहेत


पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन तुपे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप आणि मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांच्या प्रामुख्याने लढत होत असताना हडपसरच्या राजकारणात मोठी घडमोड घडली आहे.

माजी आमदाराने घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे त्यांचा फटका कुणाला बसणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी आमदार महादेव बाबर यांनी अपक्ष आमदार गंगाधर बधे यांनी पाठींबा जाहीर केला आहे.


हडपसरमधून महादेव बाबर हे इच्छुक होते. त्यांनी प्रचाराला सुरवातही केली होती. पण महाविकास आघाडीमध्ये हडपसरची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटली. प्रशांत जगताप हे आघाडीचे उमेदवार आहेत.

जगताप यांना उमेदवारी जाहीर होताच महादेव बाबर यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला होता. पण त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेल्या महादेव बाबर यांनी अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

"मतदारसंघांमध्ये मला मानणारा शिवसैनिक व मतदारवर्ग मोठा आहे. मी केलेली विकास कामे आणि मतदारांसोबत माझा मोठा संपर्क आहे. अनेक वर्षापासून मतदार संघामध्ये नागरिकांच्या प्रश्नासाठी केलेले आंदोलन यामुळे सार्वजनिक हितांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न केला आहे," असे बाबर यांनी साम टिव्हीशीबोलताना सांगितले.

"गंगाधर बधे यांनी सुद्धा शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहून अनेक नागरिकांच्या मदतीला धावून विविध प्रश्न सोडवण्याचे काम केले.आम्ही दोघेही शिवसैनिक आहोत. त्यामुळे गंगाधर हेच महादेव बाबर आहेत आणि गंगाधर हेच शक्तिमान आहेत. त्यामुळे मतदारांनी गंगाधर बधे यांना महादेव बाबर समजूनच मोठ्या बहुसंख्येने मतदान करावे, असे आवाहन महादेव बाबर यांनी मतदारांना केले आहे

No comments:

Post a Comment

Post Top Ad