Pune Crime Branch News | वाहनांच्या तोडफोडीसह मोक्काच्या गुन्हयात 3 महिन्यांपासून फरार असलेल्या 3 आरोपींना कर्नाटकमधून अटक; गुन्हे शाखेनं काढली त्यांची धिंड - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Wednesday, 12 July 2023

Pune Crime Branch News | वाहनांच्या तोडफोडीसह मोक्काच्या गुन्हयात 3 महिन्यांपासून फरार असलेल्या 3 आरोपींना कर्नाटकमधून अटक; गुन्हे शाखेनं काढली त्यांची धिंड

वाहनांच्या तोडफोडीसह मोक्काच्या गुन्हयात 3 महिन्यांपासून फरार असलेल्या 3 आरोपींना कर्नाटकमधून अटक; गुन्हे शाखेनं काढली त्यांची धिंड


पुणे माझा न्युज नेटवर्क | प्रतिनिधी- नागेश देडे : वाहनांच्या तोडफोडीसह मोक्काच्या गुन्हयात गेल्या 3 महिन्यांपासुन फरार असलेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट-4 च्या पथकाने कर्नाटक राज्यातून अटक केली आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून आरोपींनी ज्या ठिकाणी वाहनांची तोडफोड केली होती त्याच परिसरात त्यांची धिंड काढण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात समाजविघात कृत्य तसेच वाहनांची तोडफोड करण्यापुर्वी गुन्हेगार तसेच गुन्हेगारी वृत्तीचे युवक हजार वेळा विचार करतील.
अजय चंद्रकांत विटकर (22, रा. ब्लॉक नं. 23, हरिहरेश्वर सोसायटी समोर, जुनी वडारवाडी, गोखलेनगर, पुणे), ऋषिकेश उर्फ बबल्या सुनिल देवकुळे (19, रा. धोत्रे बिल्डींग समोर, कुसाळकर 1011 वडारवाडी, गोखलेनगर, पुणे) आणि अनिकेत उर्फ डॅनी शंकर मंगळवेढेकर (22, रा. वडारवाडी, गोखलेनगर, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात दाखल असलेल्या गुन्हयातील तसेच मोक्का मधील आणि फरारी आरोपींबाबत विशेष मोहिम राबवुन त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत वरिष्ठ पोलिसांनी आदेश दिले होते. त्याअनुषंगाने युनिट-4 चे पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार हे चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील मोक्काच्या गुन्हयातील आरोपींचा शोध घेत होते. पोलिस अंमलदार सारस साळवी आणि प्रविण भालचीम यांना आरोपी अजय विटकर व बबल्या देवकुळे हे कर्नाटमधील बेंगलोर येथे असल्याबाबत समजले. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. एक पथक कर्नाटकला रवाना झाले.

पोलिस पथकाने दि. 10 जुलै 2023 रोजी अजय विटकर आणि ऋषिकेश उर्फ बबल्या देवकुळे यांना कर्नाटकमधून अटक केली. त्यांच्याकडे गुन्हयातील इतर साथीदारांबाबत विचारले असता त्यांनी अनिल उर्फ डॅनी मंगळवेढेकर हा अहमदनगरमधील एमआयडीसी येथे लपुन राहत असल्याचे सांगितले. दुसर्‍या पथकाने अनिल उर्फ डॅनला अहमदनगर येथून ताब्यात घेतले. तिघांना अटक झाल्यानंतर त्यांची गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धिंड काढली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास जाधव, पोलिस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पवार, पोलिस अंमलदार प्रविण भालचिम, सारस साळवी, रमेश राठोड, संजय आढारी, नागेश कुवर, विनोद महाजन आणि विठ्ठल वाव्हळ यांच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Top Ad