Pune Crime News | चांदखेड गावगुंडांचा गावच्या यात्रेत हवेत गोळीबार, 4 जणांना अटक; मावळमधील घटना - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Thursday, 12 January 2023

Pune Crime News | चांदखेड गावगुंडांचा गावच्या यात्रेत हवेत गोळीबार, 4 जणांना अटक; मावळमधील घटना

 चांदखेड गावगुंडांचा गावच्या यात्रेत हवेत गोळीबार, 4 जणांना अटक; मावळमधील घटना

 
 
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील मावळमधील चांदखेड येथे यात्रेमध्ये गावगुंडाने हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भर दिवसा गोळीबार केल्याने यात्रेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ही घटना सीसीटीव्ही आणि मोबाईलमध्ये कैद झाली असून घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. दहशत पसरवण्यासाठी हे कृत्य केल्याचे शिरगाव पोलिसांनी सांगितले.
या घटनेती आरोपीला पोलिसांनी काही तासात अटक केली. अविनाश गोठे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी गोठे याच्यासह चार जणांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी गोठे याच्यावर यापूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील चांदखेड येथे यात्रा असल्याने अनेक लोक येथे आले होते. गर्दी फायदा आणि गावात दहशत माजवण्यासाठी आरोपीने दारुच्या नशेत हवेत गोळीबार केला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट आणि शिरगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांनी गोळीबाराची घटना घडल्यानंतर अवघ्या काही
तासात आरोपींना अटक केली. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करीत आहेत

No comments:

Post a Comment

Post Top Ad