Crime News | Woman Killed in Kondhwa | कोंढवा परिसरात वाढती गुन्हेगारी.! एका अनोळखी महिलेचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Tuesday, 3 January 2023

Crime News | Woman Killed in Kondhwa | कोंढवा परिसरात वाढती गुन्हेगारी.! एका अनोळखी महिलेचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

कोंढवा परिसरात वाढती गुन्हेगारी ..! एका अनोळखी महिलेचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून


पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : कोंढवा हा परिसर नेहमी गजबजलेला असून या परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. कोंढवा पोलिसांसमोर या गुन्हेगारीला कमी करण्याचे एक मोठे आव्हान उभे आहे  कालच (०२ जानेवारी ) कोंढवा येथील एन आय बी एम साईबाबा मंदिरा जवळ रक्ताच्या थारोळ्यात, एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून येताच परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली, खून झालेले महिलेचे वय अंदाजे ३०-३५ वर्षे सांगितले जात आहे या मयत महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून मृतदेहाच्या हातावर रेणुका, भानू, संतोष, अश्विनी अशी नावे देखील गोंदलेली असून मृतदेहाच्या अंगावर व्हाईट कुडता ट्रक पॅन्ट (डार्क निळा रंग व्हाईट चेक्स येल्लो पट्टी)  असलेले वस्त्र परिधान केलेले आहे 

सदर घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली त्या ठिकाणचा पंचनामा करून अज्ञात व्यक्तीच्या नावाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार या महिलेचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचे समजत आहे मयत महिलेची ओळख अजून पटली नसून ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. खून केलेल्या आरोपीचा शोध कोंढवा पोलीस घेत आहे,

हा खून इतका निर्घृणपणे करण्यात आला आहे की महिलेच्या चेहऱ्यावरून ओळख पटने शक्य नसल्याने वर्णन केलेल्या महिलेची कोणतीही माहिती मिळाल्यास कोंढवा पोलिसांनी संपर्क साधण्यासाठी आव्हान केले आहे कोंढवा पोलीसांचा पुढील तपास सुरू असून लवकरात लवकर आरोपींचा शोध घेतला जाईल असा विश्वास दिला आहे.


सदर महिले बद्दल कोणास माहिती किंवा ओळख पटत असेल तर कृपया कोंढवा पोलीस सहा पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर मो. नं, 7350547007  यांचेशी किंवा आमचा क्रमांक यावर आपण माहिती देऊ शकता -7020873300

No comments:

Post a Comment

Post Top Ad