चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांची शिवाजीनगर न्यायालयाच्या आदेशाने सुटका- अॅड तोसिफ शेख
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : आज दिनांक ११.१२.२०२२ रोजी श्री एस व्ही निमसे साहेब प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात संभाजी ब्रिगेडचे पिंपरी शहर अध्यक्ष सतीश काळे व त्यांचे सहकारी धनाजी मधुकर येळकर यांची न्यायालयामार्फत सुटका
"अनुदानासाठी सरकारवर अवलंबून का राहता ? फुले व आंबेडकरांनी भीक मागून शाळा सुरू केल्या होत्या".
असे अपमान जनक विधान महापुरुषाबद्दल चंद्रकांत पाटील,उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, पुण्याचे पालकमंत्री, याने केले असल्यामुळे या विरोधात संभाजी ब्रिगेड व इतर सम विचारी संघटनेचे कार्यकर्ते यांनी त्यांना काळे झेंडे दाखवु, काळी शाई ,काळा बुक्का फेकून आंदोलन करण्याचे जाहीर केले होते व त्याप्रमाणे दिनांक १०/१२/२०२२ रोजी चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवड येथे शाई फेक करण्यात आली या कारणामुळे मा. सतीश काळे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संभाजी ब्रिगेड व त्यांच्या सहकाऱ्यांना काल दिनांक १०/१२/२०२२ रोजी आंदोलनाच्या ठिकाणावून अटक करण्यात आली.
वाकड पोलीस स्टेशन यांनी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतीश काळे आणि धनाजी येळकर यांना चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आंदोलन केल्याबाबत काल दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी अटक करण्यात केली होती. चंद्रकांत पाटील यांनी महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि शिक्षण सम्राट कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण संस्थान बाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत सतीश काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले होते त्यामुळे त्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना पुणे येथील विशेष न्यायालयासमोर आज दि. ११.१२.२०२२ रोजी हजर करून १५ दिवसाची पोलीस कस्टडी मागण्यात आली. बचाव पक्षातर्फे ॲड तोसिफ शेख, ॲड अतुल पाटील, ॲड क्रांती सहाने, ॲड जयदीप डोके पाटील, ॲड दीपक गायकवाड, अॅड स्वप्निल गिरमे, ॲड मनोज कदम, ॲड शिवानी गायकवाड, ॲड अशा जाधव, ॲड सुप्रभा इंगळे, ॲड सीमीन शेख यांनी जोरदार युक्तिवाद केला.
न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून तसेच पोलिसांचा आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून माननीय न्यायालयाने पोलिसांचा अर्ज फेटाळून कार्यकर्त्यांना सोडण्याचे आदेश आज दि. ११.१२.२०२२ रोजी दिले. अॅड तोसिफ शेख - ९८६०९०७३५७
न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून तसेच पोलिसांचा आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून माननीय न्यायालयाने पोलिसांचा अर्ज फेटाळून कार्यकर्त्यांना सोडण्याचे आदेश आज दि. ११.१२.२०२२ रोजी दिले. अॅड तोसिफ शेख - ९८६०९०७३५७
No comments:
Post a Comment