POLICE NEWS UPDATE : राज्यात पोलीस दलात मोठे फेरबदल, पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी रितेश कुमार तर पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी विनयकुमार चौबे - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Wednesday, 14 December 2022

POLICE NEWS UPDATE : राज्यात पोलीस दलात मोठे फेरबदल, पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी रितेश कुमार तर पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी विनयकुमार चौबे

राज्यात पोलीस दलात मोठे फेरबदल, पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी रितेश कुमार तर पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी विनयकुमार चौबे

 पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : मुंबईसह राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. मीरा भायंदर, वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची एटीएसच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून मुंबई गुन्हे शाखेची जबाबदारी लखमी गौतम यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था सहपोलीस आयुक्तपदी सत्यनारायण चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलीस महासंचालक पदावर बदली करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तपदी मिलिंद भारंबे यांची वर्णी लागली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून बदल्यांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्य पोलीस दलात वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांच्या बदल्याचे आदेश गृहविभागाकडून मंगळवारी जारी करण्यात आले आहे. मुंबई पोलीस दलातील चारही सहपोलीस आयुक्त बदलण्यात आले आहेत. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सत्यनारायण चौधरी यांच्या खांद्यावर देण्यात आली असून सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची आयुक्तपदावरून अपर पोलीस महासंचालक कायदा सुव्यवस्था या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. तर पुण्यात पोलीस आयुक्तपदी रितेश कुमार यांची बदली करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग यांची बदली करून त्यांच्या जागी मिलिंद भारंबे यांची वर्णी लागली आहे.

कोणत्या अधिका-यांची झाली बदली?
विनयकुमार चौबे पिंपरी चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त मीरा भाईदरचे पोलीस आयुक्त सदानंद दाते हे राज्याच्या दहशतविरोधी विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक, अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांचीही बदली करण्यात आली आहे. मुंबईच्या वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांचीही बदली मुंबई वाहतूक विभागाची जबाबदारी प्रवीण पडवळ यांच्याकडे देण्यात आली
 
कोणकोणत्या अधिकाऱ्यांची कुठे झाली बदली?
 
अपर पोलीस महासंचालक :
सदानंद दाते - अपर पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

विश्वास नांगरे-पाटील - अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई [पदोन्नतीने] (श्री. विनय कुमार चौबे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर)

मिलिंद भारंबे - पोलीस आयुक्त, नवी मुंबई [पदोन्नतीने]

राज वर्धन - अपर पोलीस महासंचालक- नि- सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. [ पदोन्नतीने]

विनय कुमार चौबे - पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड [पद उन्नत करुन]

अमिताभ गुप्ता - अपर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य, मुंबई

निकेत कौशिक -अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई. (श्री. प्रभात कुमार यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर)

विशेष पोलीस महानिरीक्षक :


शिरीष जैन - सह आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई

संजय मोहिते - विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, यांचे कार्यालय, मुंबई.

पोलीस उप महानिरीक्षक :

नवीनचंद्र रेड्डी - पोलीस आयुक्त, अमरावती शहर

आरती सिंह - अपर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस, बृहन्मुंबई

नामदेव चव्हाण - पोलीस उप महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे

निसार तांबोळी - अपर पोलीस आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई

ज्ञानेश्वर चव्हाण - अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई

रंजन कुमार शर्मा - अपर पोलीस आयुक्त, विशेष शाखा, बृहन्मुंबई

याशिवाय विनित अगरवाल, बिपिन कुमार सिंह, देवेन भारती, प्रभात कुमार, महेश पाटील या अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली असून ते अद्याप पदस्थापनेच्या प्रतिक्षेत आहेत.

अपर पोलीस महासंचालक :

रितेश कुमार - पोलीस आयुक्त, पुणे शहर

मधुकर पांडे - पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर वसई-विरार

प्रशांत बुरडे - अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई

विशेष पोलीस महानिरीक्षक :

सत्यनारायण चौधरी - पोलीस सह आयुक्त, कायदा आणि सुव्यवस्था, बृहन्मुंबई

निशित मिश्रा - पोलीस सह आयुक्त, आर्थिक गुन्हे, बृहन्मुंबई

प्रवीण पडवळ - पोलीस सह आयुक्त, वाहतूक, बृहन्मुंबई

लखमी गौतम - पोलीस सह आयुक्त, गुन्हे, बृहन्मुंबई

एस. जयकुमार - पोलीस सह आयुक्त, (प्रशासन), प्रशासन, बृहन्मुंबई

अंकुश शिंदे - पोलीस आयुक्त, नाशिक शहर

प्रवीण पवार - विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, कोकण

सुनिल फुलारी - विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

पोलीस उप महानिरीक्षक :

अनिल कुंभारे - अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई

परमजीत दहिया - अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई

विनायक देशमुख - अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई

राजीव जैन - अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, बृहन्मुंबई

याशिवाय सुहास वारके, राजकुमार व्हटकर, जयंत नाईकनवरे, बी. जी. शेखर, संजय दराडे आणि विरेंद्र मिश्रा या अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली असून ते अद्याप पदस्थापनेच्या प्रतिक्षेत आहेत.
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

Post Top Ad