Pune Kidnapping Case | अखेर चार वर्षाचा काळजाचा तुकडा स्वर्णव सुखरुप सापडला; अभिनंदन पुणे पोलीस.. ! - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Wednesday, 19 January 2022

Pune Kidnapping Case | अखेर चार वर्षाचा काळजाचा तुकडा स्वर्णव सुखरुप सापडला; अभिनंदन पुणे पोलीस.. !

पुणे माझा न्युज : प्रतिनिधी - बालेवाडी परिसरातून अपहरण झालेल्या चार वर्षाच्या मुलाचा शोध लागलाय. दहा दिवसानंतर पुनावळे येथे तो सापडला असून अपहरणकर्ते पळून गेले असल्याची माहिती समोर आली आहे. स्वर्णव उर्फ डुगु असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव होते. दहा दिवसांपूर्वी त्याचे अपहरण झाले होते. त्याच्या शोधासाठी सोशल मीडियावर अनेकांनी आवाहन केलं होतं. अखेर हा मुलगा सुखरुप घरी परतला आहे. पुण्यातील बालेवाडी हायस्ट्रीट जवळील पाठशाळा परिसरातून स्वर्णव चव्हाण उर्फ डुग्गू या चार वर्षांच्या चिमुरड्याचं अपहरण झाल्याचा संशय होतं. तसं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं होतं. गेल्या दहा दिवसांपासून त्याचा शोध सुरु होते. दरम्यान, स्वर्णवचे वडील सतीश चव्हाण सोशल मीडियावरुन अपहरणकर्त्यांना वारंवार आवाहन करताना दिसले होते. हवे तितके पैसे घ्या, मात्र माझ्या लेकराला सोडा, अशी आर्त विनवणी सतीश चव्हाण केली होती.


 याशिवाय,स्वर्णवला ताप आला असल्यास, त्याला कोणतं कफ सिरप द्यावं, याबद्दलही सतीश चव्हाणांनी माहिती दिली होती. त्याच प्रमाणे चार वर्षांच्या लहान मुलासाठी औषध विकत घ्यायला येणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवा, असं आवाहनही चव्हाणांनी फार्मसी स्टोअर चालकांना केलं होते. सतीश चव्हाणांची अगतिकता पाहून नेटिझन्सही हळवे झाले होते. अखेर स्वर्णव घरी सुखरुप परतल्यामुळे त्याच्या पालकांचा जीव भांड्यात पडला आहे.

दरम्यान, स्वर्णव दहा दिवस होता कुठे? तो राहिला कुठे? कोण त्याला घेऊन गेलं होतं? त्याच्यासोबत नेमकं काय घडलं? याची माहिती मिळू शकलेली नाही. असं असलं तरी स्वर्णव घरी परतल्यामुळे त्यांच्या आईवडिलांच्या जीवात जीव आलाय.

पुणे शहर पोलीस, पुणे पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांच्यासह स्वर्णवला शोधण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !

No comments:

Post a Comment

Post Top Ad