हरियाणा व दिल्लीतील २२ गुन्ह्यातील आरोपी हरियाणा पोलिसांच्या अटकेतून फरार आरोपी शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात
पुणे माझा न्युज : प्रतिनिधी इम्रान पुनावाला पुणे : शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करताना हरियाणा आणि दिल्ली मधील २२ गुन्ह्यांमध्ये मोस्ट वाँटेड असलेल्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे यांनी दिली आहे.
शनिवारी दिनांक 23/1/2022 रोजी ४:०० वाजताच्या दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना इराणी वस्ती विष्णूकृपानगर शिवाजीनगर पुणे. येथे दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्हयाच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना एक संशयित इसम आम्हाला पाहून पळून जाऊ लागले. असता,तो इसम संशयतरीत्या पळून जाताना त्यात शिताफीने पकडून शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे आणून विचारपूस साठी ताब्यात घेण्यात आले, सदर संशयित इसमाची अधिक माहिती काढली असता त्याचे नाव १) जाफर अली खान इराणी ३० वर्ष, ईराणी वस्ती शिवाजीनगर पुणे असे नाव असून तो नुकताच कोंढवा पो. स्टे. येथील गुन्ह्यात अटक असून त्याचा जामीन झालेला आहे, तसेच तो श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नंबर ११६/२०२१ भादवि कलम ३७९,१७० प्रमाणे दाखल गुन्ह्यात पाहिजे असले बाबत माहिती प्राप्त झाली, तसेच हरियाणा व दिल्ली येथे मोस्ट वॉन्टेड असून तो एकूण २२ गुन्ह्यांमध्ये पाहिजे असल्याबाबत माहिती मिळाली.
गुन्ह्यांतील आरोपीला इतर वस्तीमध्ये शिवाजीनगर भादवि कलम 79,420,170,120 ब,34 पोलीस स्टेशन यांनी नमूद दाखल गुन्ह्यात आरोपी नामे अलि खान इराणी अटक तेव्हा तो अटकेतून पळून होता त्यावरून हिसार पोलीस स्टेशन पोलीस निलंबित केले होते, सदरच्या गुन्ह्यात राज्याचे माननीय. आय. जी. पी. सर कॉर्डीनेट करत आहेत, सदर आरोपी श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांचे ताब्यात आहे.
सदरची पोलीस आयुक्त विश्रामबाग शहर निरीक्षक अनिता मोरे,विक्रम गौड पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक माने, पोलिस भैरवनाथ पोलिस उपनिरिक्षक विनोद महागडे, पोलीस निरीक्षक विजय पानकर पो.हवा. बशीर पोलीस, पोलीस नाईक इनामदार, अंमलदार राहुल होळकर, पोलीस अंमलदार अनिकेत भिंगारे, पोलीस अंमलदार ,पोलीस अंमलदार कोल्हे, अंमलदार यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment