भानू काळे, डॉ. विनिता आपटे,धनंजय शेडबाळे, नितीन सोनवणे, असलम बागवान ठरले मानकरी
पुणे माझा न्यूज प्रतिनिधी - पुणे - महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि 'प्रबोधन माध्यम' यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे 'डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२१' जाहीर झाले आहेत.
डॉ.पी ए इनामदार गुणवत्ता, कार्यक्षमता पुरस्कारासाठी डॉ. मुश्ताक मुकादम, बिलाल शेख यांची निवड करण्यात आली आहे.संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक बीडकर यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.
‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२१' चे वितरण सोमवार ,दि . २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांच्या हस्ते आझम कॅम्पस येथील हाय टेक हॉल मध्ये करण्यात येणार आहे. खासदार डॉ अमोल कोल्हे हे दूरदृश्य प्रणाली द्वारे सहभागी होणार आहेत .
‘महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित केले जाते . यावर्षी डॉ.पी. ए. इनामदार यांचा ७७ वा वाढदिवस असून, सन्मान सोहळ्याचे तेरावे वर्ष आहे. रोख रक्कम,सन्मानचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ असे या सन्मानाचे स्वरूप आहे.
No comments:
Post a Comment