स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई-शिक्रापूरमध्ये झालेल्या तृतीयपंथीच्या खुनाचा चार तासांत केला उलगडा, दोन आरोपी ताब्यात
पुणे माझा न्युज : प्रतिनिधी प्रशांत व्यवहारे शिरूर : शिक्रापुर परीसरात हायवे रोडलगतचे तोरणा हॉटेल समोरील हरीष येवले यांचे प्लॉटींग लगतचे मोकळ्या जागेत एका तृतीयपंथी व्यक्तीचा मृतदेह निर्घुण खुन झालेल्या अवस्थेत आढळून आला. मयताची ओळख पटवुन मयत तृतीयपंथीचे नाव आशु उर्फ आनिश रामानंद यादव सध्या रा. बजरंगवाडी, शिकरपुर ता. शिरूर जि.पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले. झालेल्या प्रकाराबाबत अनिता सोमनाथ सासवडे रा. बजरंगवाडी, शिक्रापुर ता. शिरूर जि.पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ मा. पोलीस अधीक्षक, डॉ. अभिनव देशमुख सो यांनी स्था.गु.अ.शाखा पुणे ग्रा. चे तपास पथकाला योग्य त्या सुचना करून सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश केले होते. शिक्रापुर परीसरातील अहमदनगर ते पुणे हायवे रोडलगत तोरणा हॉटेल समोरील हरीष येवले यांचे प्लॉटींग लगतचे मोकळया जागेत तृतीयपंथी व्यक्तीचा मृतदेह आढळुन आला होता. सर्व प्रथम मृतदेहाची ओळख पटविणे गरजेचे होते. स्थानिक नागरीकांचे मदतीने मृतदेहाची ओळख पटवुन मयत तृतीयपंथी राहत असलेल्या परीसरातील लोकांकडे चौकशी करून त्याला शेवटचे कोठे पाहण्यात आले अशी माहिती प्राप्त केली गेली. त्यानंतर गोपनीय माहितीचे आधारावर सदरचा गुन्हा हा १) धर्मु जोडीतराम ठाकुर वय २० वर्षे, २) युगल लालसिंग ठाकुर वय १९ वर्षे दोघे सध्या रा. साकोरे हॉस्पीटल मागे, गणेश सांडभोर यांचे खोलीत, बजरंगवाडी, शिक्रापुर ता. शिरूर जि.पुणे, मुळ रा. ढाबा ता. डोंगरगाव जि. राजनंदगाव राज्य छत्तीसगढ यांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली. सदरचे आरोपींचा शोध घेत असताना ते दोघेही छत्तीसगढ़ येथे पळून जाणेचे तयारीत असून शिक्रापुर-चाकण चौकाकडे जात आहेत, अशी माहिती मिळाल्याने त्या दोघांना सापळा लावून शिक्रापुर-चाकण चौक परीसरातुन ताब्यात घेण्यात आले. सदरचा गुन्हा त्यांनी केल्याचे सांगितले असून यातील आरोपी धर्मु जोहीतराम ठाकूर व युगल लालसिंग ठाकूर हे दोघे घटनेच्या ठिकाणाजवळ दारू पित बसले होते. धर्मु ठाकूर याने तृतीयपंथी नामे आशु उर्फ अनिश रामानंद यादव याचे सोबत जवळीक करण्याचा प्रयत्न केला, पैशाचे देवाण घेवाणीच्या झालेल्या वादातून दोन्ही आरोपींनी तृतीयपंथी आशु उर्फ आनिश रामानंद यादव वय २३ वर्षे सध्या रा. बजरंगवाडी शिक्रापुर ता. शिरूर जि.पुणे हिचा खून केल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही आरोपींना शिक्रापुर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास शिकापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे व पथक करत आहेत.
सबब सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख सो,बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक श्री. मिलींद मोहिते सो.यांचे मार्गदर्शन खाली स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके सो.सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे,सहा फौज तुषार पंदारे, पोहवा. जनार्दन शेळके, पोहवा. राजु मोमीण, पो.हवा अजित भुजबळ, पो.ना. मंगेश थिगळे,
पो.ना. योगेश नागरगोजे,पो.कॉ. चेतन पाटील यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment