उपेक्षित घटकांसाठी कार्यरत असणाऱ्या शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्य प्रेरणादायी : नानासाहेब पटोले
....................................................................................................................................................................
पुणे माझा न्युज : प्रशांत व्यवहारे: तळेगाव ढमढेरे : गोरगरीब व तळागाळातील घटकांना समोर ठेवून तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात देत असलेले भरीव योगदान महाराष्ट्रातील इतर संस्थाना प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन विधानसभेचे माजी सभापती व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी केले.
नूतन वर्षाचे औचित्य साधून श्री. नाना पटोले यांनी तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या शैक्षणिक संकुलास भेट देऊन संस्थेच्या प्रेरणादायी कार्याची माहिती घेतली. गोरगरीब व तळागाळातील विविध घटकांसाठी संस्था करत असलेले कौतुकास्पद काम त्यांनी विशेष वेळ देऊन जाणून घेतले. पुणे जिल्हा काँग्रेसचे खजिनदार व शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान संचालक महेश बापू ढमढेरे यांच्या प्रयत्नातून हा विशेष योग जुळून आला. यावेळी महेशबापू ढमढेरे यांच्या कामाचे व पक्ष्यासाठी करत असलेल्या धडपडीचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते श्री. चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री मोहम्मद आरिफ नसीम खान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व जेष्ठ नेते देविदास भन्साळी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव निखिल कवीश्वर, मा. सचीन साठे, बारामती लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष लहूअण्णा निवंगुणे, प्रदेश काँग्रेसचे सदस्य अमित मेश्राम,पुणे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अवधुतअण्णा मते, खडकवासला विधानसभा अध्यक्ष किशोर रायकर, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आबा जगताप, शिरूर तालुका काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष वैभव शेठ यादव, शिरूर तालुका भटक्या विमुक्त विभागाचे अध्यक्ष प्रदीप मेहेकरे , शिरूर तालुका काँग्रेसच्या शहराध्यक्ष व नगरसेविका संगीता महेंद्र मल्लाव, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, संस्थेचे मानद सचिव व जेष्ठ काँग्रेस नेते अरविंददादा ढमढेरे, शिरूर महिला काँग्रेस अध्यक्षा प्रियांका बंडगर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमजद पठाण, शिरूर किसान काँग्रेसचे अध्यक्ष रामदास थोरात, शिरूर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सचीन पंडित, शंतनू मल्लाव, संतोष शिंदे, पुणे जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष अशोक भुजबळ, मनोज आल्हाट, रिपब्लिकन पक्षाचे नवनाथ कांबळे, कैकाडी सेलचे अध्यक्ष अनिल गायकवाड, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक राहुल गुजर, परेश सातपुते, सुषमा उबाळे, महेश किसनभाऊ भुजबळ , सुनील ढमढेरे , किरण आंबेकर, शिरूर शहर अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष अजीमभाई सय्यद, दौंड तालुका काँग्रेस अध्यक्ष विठ्ठल दोरगे, प्रवीण म्हेत्रे, रायकुमार गुजर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment