पुणे माझा न्युज : पुणे चेष्टा मस्करीमध्ये झालेल्या भांडणातून तरुणावर चाकूने वार करुन तरुणाचा खून करण्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने मित्राचा चाकूने वार करुन स्वत: फरासखाना पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
अमन अशोक यादव (वय २६) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. आर सी एम गुजराती शाळेजवळ हा प्रकार घडला असून सकाळी उघडकीस आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पाटील व त्याचा मित्र अमन यादव हे कचरा वेचण्याचे काम करतात. दोन -तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडणे झाली होती. त्याचा राग पाटील याच्या मनात होता. आज सकाळी आर सी एम गुजराती शाळेजवळ पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी पाटील याने अमन यादव याच्यावर चाकूने वार करुन त्याचा खून केला. त्यानंतर त्याची माहिती त्यानेच स्वत: पोलीस चौकीत येऊन दिली. या प्रकाराने पोलिसांमध्येही खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर तेथे एक मृतदेह पडलेला आढळूनआला. मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकारी रवाना झाले आहेत. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
No comments:
Post a Comment