पुणे माझा न्युज प्रतिनिधी : इम्रान पुनावाला पुणे :इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप तर्फे दरवर्षी प्रमाणे या वेळेसही संविधान दिनानिमित्त दि. २६ नोव्हेंबर रोजी व्हॅलीव्यूह स्कूल, मिठानगर, कोंढवा खुर्द येथे संविधान सभा, संविधान जागर, संविधान रक्षण, संविधान शाळा या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमात शालेय विद्यार्थी, थानिक नागरीक यांच्याश गप्पा गोष्टितून संविधानाची माहिती, संविधान कसा लिहिला गेला, संविधान सभेतील चर्चा संविधान प्रचार कसा करावा या बद्दल चर्चा करण्यात आली,
या कार्यक्रमाचा आनंद आणी संविधानाची माहिती विद्यार्थी वर्गाने अतिशय उत्सुकतेने ऐकली तसेच संविधान प्रश्राची उत्तरे देणार्या विद्यार्थांना पारितोषिक देण्यात आले आणी या भागातील महिलांना साडीचे वाटप यावेळी करण्यात आले .वइनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे दर वर्षी समाजीक संस्था, कोवीड योध्दा, पत्रकार डाँक्टर, अँडव्होकेट, यांचा सत्कार करण्यात येतो परंतु आज निरंतर समाजसेवा करणारे इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे पदाधिकारी,
राजू सय्यद, विना कदम, सचिन आल्लाट, साहिल मणियार, शानू पठाण, नितिन बसरूर, रियाज बंगाली, अहमदखान, बदी उज्जमा, समीउल्लाह खान, नासिर शेख, अमोल शेरेकर, शिवा पाटिल, मुन्निभाई, प्रसिध्द प्रमुख रियाज मुल्ला, ऋषिकेश गायकवाड इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे लिगल अडव्हजर वसिम शेख व इतर पदाधिकारी यांना मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देवून संन्मानित करण्यात आले तर आपल्या भागातील महिला स्वावलंबी बनावे या करीता स्वयंरोजगार करीता १५ शिलाई मशिनचे वाटपहि यावेळी इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे करण्यात आले

तसेच या कार्यक्रमात मानव कांबळे, माजी नगरसेवक मारूती भापकर, लक्षमी श्रीकांत, संदिप बर्वे, साधना धदिच, सुनिती सुर, इब्रिहिम खान, दिपक बिडकर, मनिष देशपांडे व संविधान प्रचारक टिम व इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. अशी माहिती इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान यांनी दिली.
No comments:
Post a Comment