पुणे माझा न्यूज : प्रतिनिधी पुणे : विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गु.र.क्र १९०/२०२१ भा.द.वि कलम ३९२,४१३.३४ प्रमाणे दि. दि. ०२/११/२०२१ रोजी गुन्हा दाखल असून दाखल गुन्हयातील फिर्यादी हबीबा अब्दुल शेख, वय ५१ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. प्लॅट नं ९, साई प्रसाद बिल्डींग, विशाल परिसर, कळस, विश्रांतवाडी, पुणे हया त्यांचे घराचे समोर विशाल परिसर, कळस येथे त्यांचे समर्थ टपरीचे बाहेर बाजूस बाकावर बसले असता त्यांचे टपरीचे समोर उभे असलेले दोन अनोळखी इसम हे त्यांचे समोर काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन येवून दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांचे गळ्यातील ३ तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसका मारुन तोडुन जबरी चोरी करुन कळस गावठाणच्या दिशेने पळुन गेले होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळाचे आजू बाजूचे फुटेज वरून एकुण १५० ते २०० सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून पोशि प्रफुल मोरे व पोशि शेखर खराडे, पोशि संदिप देवकाते यांनी सदर अज्ञात वाहनाचा व चैन चोरांचा मार्ग काढला असता सदरचे अज्ञात आरोपी हे बारामती येथे गेल्याचे निष्पन्न झाल्याने पो. हवा दिपक चव्हाण व पोशि संदपि देवकाते यांनी सदर ठिकाणी जावून त्यांनी त्यांचे बातमीदारामार्फत सदर आरोपींची माहिती काढली असता सदरचे आरोपी हे २९ फाटा, बारामती येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सदर ठिकाणी जावून सापळा रचून त्यांना ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) अशोक नामदेव गंगावणे वय ३१ वर्षे, रा. मु. बांदलवाडी, ता. बारामती, जि. पुणे २) अनिल रघुनाथ बिरदवडे वय ३२ वर्षे, रा. सदर असे सांगीतले त्यांनी गुन्हा कबुल केल्याने त्यांना दाखल गुन्हयात दि. १५/११/२०२१ रोजी अटक करण्यात आली असून त्यांनी अटक मुदतीत गुन्हयातील मुददेमाल ३ तोळे वजनाची सोन्याची चैन ही इसम नामे अकाश महादेव सोनार रा. बारामती पुणे यास विक्री केल्याचे सांगीतल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचेकडून गुन्हयातील मुददेमाल हस्तगत केला असून त्यास दि. २४/११/२०२१ रोजी अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा.श्री नामदेव चव्हाण अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. रोहीदास पवार, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, मा. श्री रमेश गलांडे सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, मा. श्री अजय चांदखेडे वपोनि विश्रांतवाडी तसेच श्री विजयकुमार शिंदे पो नि गुन्हे सपोनि संदिप यादव यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पो. उप-निरीक्षक लहु सातपुते व अंमलदार विजय सावंत, दिपक चव्हाण, यशवंत किर्वे, प्रफुल्ल मोरे, शेखर खराडे संदीप देवकाते, शिवाजी गोपनर, योगेश चांगन व विशेष पोलीस अधिकारी राज राठोड (पी-४ महाराष्ट्र राज्य) यांचे पथकाने उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.
Nice
ReplyDelete