सासवड, प्रतिनिधी : सासवड पोलीस स्टेशन हद्दीत जबरी चोरी करणारे गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार यातील फिर्यादी नामे हे ऋषीकेश सुनील पवार (वय-१९ वर्षे, धंदा किराणा दुकान, रा. उदाचिवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे) हे दि. ०४/ ०९/ २०२१ रोजी रात्री ८:०० वा. च्या सुमारास त्यांचे किराणा दुकान बंद करून त्यांचे टेम्पोमधून सासवड ते उदाचीवाड़ी असे रोडने घरी जात असतांना रस्त्यामध्ये ३ अनोळखी चोरटे हिरो होंडा स्लेंडर मोटर सायकलवर येऊन फिर्यादीस मोटर सायकल आडवी मारून ‘तू माझे पायावर गाड़ी का घातली’ असा बनाव करून फिर्यादीस गाडीतुन खाली ओढून बाजूला अंधारात शेतात नेऊन लोखंडी रॉडने मारहाण करून फिर्यादीचे गळ्यातील २ तोळे सोन्याची चैन, रोख रक्कम ५०,०००/- व मोबाईल असा एकून १,३५,०००/- रुपयाचा ऐवज जबरीने काढून घेऊन मोटर सायकलवर पळून गेले होते. सदरबाबत सासवड पोलीस स्टेशन गु.र.नं. ३४०/२०२१ भा. दं. वि. का. क. ३९४, ३४ अन्वये दिनांक ०५/ ०९/ २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी गुन्हे शोध पथकाला गुन्हा उघडकिस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के, पोलीस नाईक गणेश पोटे, निलेश जाधव, विक्रम भोर यांनी सासवड, जेजुरी, हडपसर असे वेगवेगळ्या ठिकाणचे सी.सी.टी.व्हि फुटेज तपासले, रेकॉर्ड वरील असे गुन्हे करणारे आरोपींची माहिती घेतली. सी.आय.डी ऑफिस यांचेकडून आरोपींचे वर्णनाचे स्केच काढले असे वेगवेगळया मार्गाने तपास करीत असतांना पथकास गोपनीय बातमी मिळाली की, गुह्यातील आरोपी हे सातारा व सोलापुर जिल्ह्यातील असून गुन्हा करून ते कर्नाटक राज्य व जिल्हा सोलापुर येथे पळुन गेले आहेत. त्या अनुशंगाने पथकाने तात्काळ सोलापूर येथे जाऊन वेशांतर करून आरोपींची माहिती काढुन खालील आरोपींना ताब्यात घेतले.त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा आम्हीच केला असल्याची कबुली दिली आहे. आरोपी १) रोहन संजय माने (वय-१८ वर्षे, रा . देगांव , ता / जि.सातारा), २) ज्ञानेश्वर उर्फ माऊली भिकाजी चव्हाण (वय-१९ वर्षे, रा . खुनेश्वर, ता. मोहोळ, जि . सोलापुर), ३ ) रोहन उर्फ रॉबिन रमेश चव्हाण (वय-१९ वर्षे, रा. खुनेश्वर, ता . मोहोळ, जि. सोलापुर) वरील आरोपींकडून गुह्यात वपरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल एम.एच. – १३, सी वाय -०९६४, १ रेडमी कंपनीचा मोबाईल, २ तोळे सोन्याची चैन , रोख रक्कम ५०,०००/- असा एकून १,३५,०००/- रुपयाचा जबरीने काढून घेतलेला ऐवज जप्त करण्यात आलेला आहे. तसेच गुन्हयातील जबरीने चोरलेली २ तोळे सोन्याची चैन ही ज्ञानेश्वर तुकाराम पोतदार (वय-४० वर्षे, रा.सासवड ता.पुरंदर, जि.पुणे (सोनार) यांना विकेलेली असल्याने त्यांना गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
No comments:
Post a Comment