अशीच एक तक्रार महिला नामे सौ. प्राची महेश कांबळे, वय ४० वर्षे, रा. गणेश नगर, धनकवडी, पुणे यांनी केली होती कि,यांचे किंमत रुपये १,१५,०००/- रुपये किमतीचे २.५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र धनकवडी परिसरात गहाळ झाले होते. त्यांनी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे येवुन सदर बाबत माहिती दिली. लागलीच मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती देसाई यांनी मंगळसूत्र शोधण्याचे आदेश दिले. त्यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधिर घाडगे, पोलीस अंगलदार प्रदिप बेडीस्कर, शिवलाल शिंदे व सागर शिंदे यांनी अवघ्या दोन तासात धनकवडी परीसरात पाहणी करून गहाळ झालेले मंगळसुत्र शोधुन ते महिला नामे सौ. प्राची कांबळे यांचे ताब्यात दिले आहे.
पुणे माझा न्यूज : गुन्हे प्रतिनिधी इम्रान पुनावाला : दिवसेंदिवस पुणे शहरात कोठे न कोठे गुन्हे घडत असतात त्यातच कोरोना महामारीने लोकांना त्रस्त करून टाकले अशातच पोलीस प्रशासनावर ताण वाढला आहे यात दररोज पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी येत असतात या तक्रारींचे निवारण पोलिसांना करावे लागते.
No comments:
Post a Comment