PUNE CRIME NEWS : Honey Trap | हनी ट्रॅपद्वारे: व्यावसायिकाला लुटणारी टोळी गजाआड, तरुणीसह ६ जणांना ७२ तासांच्या आत अटक, कोंढवा पोलिसांची उत्तम कामगिरी - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Wednesday, 18 August 2021

PUNE CRIME NEWS : Honey Trap | हनी ट्रॅपद्वारे: व्यावसायिकाला लुटणारी टोळी गजाआड, तरुणीसह ६ जणांना ७२ तासांच्या आत अटक, कोंढवा पोलिसांची उत्तम कामगिरी

पुणे माझा न्युज : गुन्हे प्रतिनिधी इम्रान पुनावाला पुणे : कोंढव्यातील येवलेवाडी येथे बोलावून जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तरुणी व साथीदारांनी व्यवसायिकाकडे ५० लाखाच्या खंडणीची मागणी केली. यावेळी व्यवसायिकाच्या खिशातील ५० हजाराची रोकड व त्यांच्या जवळील एटीएम कार्डद्वारे ३० हजार असे ७० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पाच लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर आरोपी व्यवसायिकाला सतत फोन करत होते. शेवटी त्यांनी कोंढवा पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली होती.

तांत्रिक विश्लेषनाद्वारे पोलीस अंमलदार गणेश चिंचकर यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी आरोपींना बोपदेव घाट गारवा हॉटेल येथून अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. अटक टोळीतील रविंद्र बदर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

तरुणीच्या पतीसोबत त्याची मैत्री होती. त्यातूनच त्याने संबंधीत तरुणी व तिच्या भावाला एकत्र करून येवलेवाडी परिसरात एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. तेथून तो ही हनीट्रॅप टोळी चालवत असल्याचे पोलिसांनी सांगितले, न्यू पनवेलच्या एका व्यावसायिकाने मात्र, पोलिसांकडे जाण्याचे धाडस केले अन कोंढवा पोलिसांनी या तरुणीसह ६ जणांना ७२ तासांच्या आत अटक केली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक प्रभाकर कापुरे व त्यांच्या पथकाचे कौतुक केले

रविंद्र भगवान बदर (वय २६, रा. इंदापूर), सचिन वासुदेव भातुलकर (रा. येवलेवाडी), आण्णा राजेंद्र साळुंके (वय ४०, रा. गोकुळनगर कोंढवा), अमोल साहेबराव ढवळे (वय ३२, रा.बाणेर मुळ सोलापूर माढा), मंथन शिवाजी पवार (वय २४, रा. इंदापूर), आणि १९ वर्षाची तरुणी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. केवळ ९ वी पास असलेल्या पण सोशल मिडियाचा वापर करण्यात पटाईत. पतीच खुनाच्या गुन्ह्यात कारागृहात गेलेला तर, पतीचा मित्रही गुन्हेगार, अशा या गुन्हेगार मित्राच्या मदतीने हनीट्रॅपचा सापळा लावून आजवर अनेकांना लुबाडले. या टोळीतील १९ वर्षाच्या तरुणीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पनवेलच्या व्यवसायिकासोबत ओळख निर्माण केली. त्यातूनच मैत्री करत त्यांना तरुणीने जाळ्यात खेचले.

कोंढवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, हवालदार योगेश कुंभार, गणेश चिंचकर, महेश राठोड, अभिजित रत्नपारखी व त्यांच्या सहकार्यांनी ही कामगिरी केली फिर्यादी यांना या टोळीने प्रकरण मिटविण्यासाठी ५० लाखांची मागणी करुन ५ लाख रुपये देण्याचे ठरले होते. घटना घडली. त्यावेळी त्यांनी ७० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते.राहिलेले ४ लाख रुपयांसाठी आरोपी फिर्यादीला फोन करत होते. या व्यवसायिकाने फिर्याद देताना याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करुन आरोपींचा माग काढला. त्यानंतर सर्वांना अटक केली. त्यांच्याकडील मोबाईलमध्ये त्यांनी अनेकांशी असा संवाद साधला असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्या मोबाईलची सायबर तज्ञांकडून तपासणी करण्यात येणार आहे.

संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन

ही तरुणी सोशल मिडियावर प्रगती जाधव या नावाने संपर्क साधून ओळख करायची. ओळख वाढवून त्याला पुण्यात भेटायच्या बहाण्याने बोलवयाची. त्याच्याशी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटवर शरीरसंबंध प्रस्थापित करत असे. त्यानंतर त्या टोळीतील इतर जण या सावजाला अडवून मारहाण करुन ब्लॅकमेल करीत व त्याच्याकडून पैसे लुबाडत असत. या टोळीने अनेकांना अशा प्रकारे लुबाडले असण्याची शक्यता आहे. अनेकांनी भितीपोटी किंवा अब्रुला घाबरुन तक्रार देण्यास पुढे आलेले दिसत नाही. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी कोंढवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


1 comment:

Post Top Ad