PUNE NEWS : पतितपावन जातीवाचक संघटनेच्या विरोधात दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम व इतर संघटनांचे धरणे आंदोलन - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Friday, 13 August 2021

PUNE NEWS : पतितपावन जातीवाचक संघटनेच्या विरोधात दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम व इतर संघटनांचे धरणे आंदोलन

PUNE NEWS : पतितपावन जातीवाचक संघटनेच्या विरोधात दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम व इतर संघटनांचे धरणे आंदोलन  

पुणे माझा न्यूज - प्रतिनिधी इम्रान पुनावाला : पुणे शहरातील अत्यंत कार्यक्षम पोलीस उपायुक्त मॅडम प्रियंका नारनवरे यांची जाणून बुजून बदनामी करणाच्या पतितपावन संघटनेच्या कार्यकर्त्यांवर तसेच सदर षडयंत्र सामिल पोलीस हवलदार यांचेवर अट्रोसिटी ऍक्ट कायदयानुसार कारवाई करण्यात यावी असे निवेदन अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश दलित पँथर यशवतभाऊ नडगम यांनी मा. जिल्हा अधिकारी पुणे यांना आज समक्ष भेटुन दिले. सदर प्रकरणामध्ये नडगम यांनी मा. जिल्हा अधिकारी यांना निवेदन देताना सदर प्रकरणास पोलीस दलातील भ्रष्ट प्रवृत्तींना सदर कार्यक्षम महिला पोलीस उपायुक्त मॅडम प्रियंका नारनवरे यांनी सदर भ्रष्ट प्रवृत्ती पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकान्यांसमक्ष मांडल्यामुळे तसेच वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहुन होते गोळा करण्याची प्रवृत्ती त्या अनुषंगाने पोलीस दलाची झालेली बदनामी या सर्वावर कारवाई करण्याच्या दृष्टीने सदर कार्यक्षम पोलीस उपायुक्त मॅडम प्रियका नारनवरे यांनी कंबर कसल्यामुळे व त्यांच्या या कृतीमुळे अनेक वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या संबंधीत अधिकान्यांचे पितळ उघडे पडल्यामुळे तसेच हप्तेगिरी बंद झाल्यामुळे काही अधिकारी दुखविले गेल्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत कारवाई सुरु करण्यात आली.

या सर्वाचा राग आल्यामुळे सदर प्रतीतपावन संघटनेने सदर प्रकरणाची शहानिशा न करताच अत्यंत कार्यक्षम उपायुक्त मॅडम प्रियंका नारनवरे यांची बदनामी करण्यासाठी तसेच त्यांनी उचलेले पाऊल याबाबत जनतेत त्यांच्या विरुध्द गैरसमज व्हावा म्हणून तसेच खरी वस्तुस्थिती बाहेर येवु नये म्हणून सदर पतीतपावन संघटनेने संबंधीत पडयंत्रात सहभागी असलेल्या पोलीस हवालदार यांनी हा सर्व प्रकार केलेला असल्यामुळे सदर पततपावन संघटनेविरुध्द अॅट्रासिटी अॅक्ट कायदयानुसार कारवाई करण्यात यावी. यासाठी सदर निवेदन यशवंतभाऊ नडगम यांनी मा. जिल्हा अधिकारी, पुणे यांना देवून आज सदर जिल्हा अधिकारी कार्यालया समोर आंबेडकर पुतळया जवळ आंदोलन केले. या अंदोलनामध्ये पुणे शहर अध्यक्ष संतोष गायकवाड, श्रीकांत दादा लोणारे, सोनाली दुगंव, जंक्सन अंथनी जंक्सन पेनम, अजय चंदगल, अतुल घायतडक, अमोल पाटोळे, राजकिरण ठोगे, मायकल क्लासो, जॉन्सन अंडी इत्यादीनी भाग घेतला.

No comments:

Post a Comment

Post Top Ad