Pune Crime : पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ आणि येरवड्यात गुटखा विक्रेत्यांवर छापे; आठ जणांना अटक - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Sunday, 8 August 2021

Pune Crime : पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ आणि येरवड्यात गुटखा विक्रेत्यांवर छापे; आठ जणांना अटक

 Pune Crime : पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ आणि येरवड्यात गुटखा विक्रेत्यांवर छापे; आठ जणांना अटक 

पुणे माझा न्युज प्रतिनिधी- इम्रान पुनावाला पुणे – पुणे पोलिसांनी गुटखा उत्पादकांवर कारवाई केल्यानंतर आता छुप्या पध्दतीने किरकोळीत गुटखा विकणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरु केले आहे. शहरातील विमानतळ व येरवडा भागात किराणा किंवा पान टपरीवर बेकायदा गुटखा विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गौरीशंकर माळी (रा.लोहगाव) याला गुटखा विकताना अटक करण्यात आली आहे. तो त्यांच्या जोगनिया माता जनरल स्टोअर्समध्ये छुप्या पध्दतीने गुटखा विकत होता. त्यांच्याकडे 4312 रुपयांचा गुटखा व प्रतिबंधित तंबाखू मिळून आली. लोहगाव येथील अलका बेकरीमध्ये गुटखा विकताना अस्लम अन्सारी (रा.लोहगाव) याला अटक केली आहे. त्याच्याकडे 1 लाख 12 हजार 326 रुपयांचा गुटखा आढळला. तर खांदवेनगर येथील वेदिका सुपर स्टोअर्समध्ये 2 हजार 220 रुपयांचा गुटखा विकताना आतिष केदारी(रा.खांदवेनगर) याला अटक करण्यात आली आहे.
तसचे घरामध्ये 5 हजार 841 रुपयांचा गुटखा विकण्यासाठी बाळगणाऱ्या युसूफभाई पालकर(55,रा.येरवडा) यालाही अटक करण्यात आली आहे. येरवड्यातील जवाननगरमध्ये वेद प्रोव्हिजन स्टोअर्समध्ये 19 हजार 820 रुपयांचा आढळून आला. याप्रकरणी मांगीलाल जाट (30,रा.येरवडा) याला अटक करण्यात आली. तर एका 45 वर्षीय महिलेला गांधीनगर येथील मुमताज जनरल स्टोअर्समध्ये 45 हजार 879 रुपयांचा प्रतिबंधिक गुटखा विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील भारत बेकरीचा चालक सिराज समी शेख(26) याला 56 हजार 165 रुपयांचा गुटखा विकताना अटक केली आहे. तर लुकमान शरिफ शेख (रा.येरवडा) याला अटक करुन त्याच्या घरातून 1 हजार 734 रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. विश्रांतवाडीतील राजीव गांधीनगरमधील अजर शेखला(31,रा.येरवडा) त्याच्या पानटपरीत 540 रुपयांचा गुटखा विकताना अटक करण्यात आली आहे.
 
पोलीस अजून इतरत्र ठिकाणी छापे मारणार का ?  हा प्रश्न नागरिकांना निर्माण झाला आहे याची गुटखा विक्रेत्यांनी धास्ती घेतली आहे

No comments:

Post a Comment

Post Top Ad