Pune Lockdown News : पुण्यातील व्यापाऱ्यांच्या मागणीला यश सोमवार पासून सर्व दुकानांच्या वाढवल्या वेळा - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Sunday, 8 August 2021

Pune Lockdown News : पुण्यातील व्यापाऱ्यांच्या मागणीला यश सोमवार पासून सर्व दुकानांच्या वाढवल्या वेळा

पुणे माझा न्युज - पुणे : पुण्यात लागू असलेल्या निर्बंधांमधून पुणेकरांना कोणती सुट मिळाली आहे. आज (रविवारी 8 ऑगस्ट ) महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीत आधीच्या निर्बंधांपेक्षा वेगळे बदल करण्यात आलेले आहेत. पुण्यातील व्यापाऱ्यांच्या मागणीला यश आले असून उद्या पासून दुकाने आणि हॉटेल्स सुरु ठेवण्याची वेळ वाढवण्यात आली आहे दुकाने सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत तर हॉटेल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहे. पुण्यातील निर्बंध शिथील करण्याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली.
यावेळी ते म्हणाले " पुण्यातील निर्बंधांमधुन सवलत देतोय पण जर पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील पॉझिटिव्हीटी रेट जर सात टक्क्यांच्यावर गेला तर ही शिथिलता पुन्हा मागे घेतली जाईल " त्यामुळे लोकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे, असे देखील अजित पवार या वेळी म्हणाले


पुण्यात काय सुरु काय बंद?

 
पुण्यातील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार
हॉटेल्स सोमवार ते शुक्रवार रात्री 10 पर्यंत सुरू राहणार त्याचबरोबर
पुण्यातील मॉल्सही रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश यावेळी देण्यात आले आहेत त्याचबरोबर लशीचे 2 डोस घेतलेल्यांना प्रवेश घेण्याऱ्या व्यक्तीला मॉल मध्ये प्रवेश दिला जाईल असे देखील सांगण्यात आले आहे
जलतरण तलाव वगळून इतर इनडोअर आणि आऊटडोअर क्रीडा प्रकार सुरु राहतील.


No comments:

Post a Comment

Post Top Ad