पोलीस उपनिरीक्षक विजय धोत्रे यांची उत्तम कारवाई मेहुण्याचा खून करून पसार झालेल्या दाजीला केली दोन तासात अटक
पुणे माझा न्यूज: इम्रान पुनावाला क्राईम रिपोर्टर : मुंबई
घरगुती वादातून मेहुण्याचा खून करणाऱ्याला अवघ्या २ तासांत गजाआड करण्यात
आले. ही उत्तम कामगिरी पोलीस उपनिरीक्षक विजय धोत्रे यांनी व त्याच्या
सहकाऱ्यांनी केली.
पुणे माझा न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, २५ जुलै रोजी बोरिवली पश्चिम परिसरातील एक्सर नायतोडी मैदानाजवळ एका रिक्षात एका इसमाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती प्राप्त होताच एम. एच. कॉलनी पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृत इसमाची ओळख पटवण्यास पोलिसांनी सुरुवात केली. अवघ्या काही वेळात मृताचे नाव संदीप रमेश राजपूत (२७) असल्याचे समजले. या प्रकरणी संदीपची बहीण ज्योती भरत मकवाना हिने फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी (गु. र. क्र. ६०९/२०२१) भादंवि कलम ३०२ नुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.संदीपच्या छातीवर तब्बल सात वार करून डोक्यात बिअरची बाटली फोडण्यात आली होती. निर्घृणपणे केलेल्या या खुनाचा तात्काळ उलगडा करण्याच्या सूचना परिमंडळ ११ चे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिल्या. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान एम. एच. कॉलनी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विजय धोत्रे यांना खबऱ्याकडून आरोपीची माहिती प्राप्त झाली. तसेच फिर्यादी ज्योती यांनी दिलेल्या माहितीचे पोलिसांनी विश्लेषण केले. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे पळून जाण्याच्या तयारीत असलेला ज्योतीचा पती भरत मकवाना (२७) याला भाईदर पूर्व परिसरातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने मेहुणा संदीप राजपूत याचा खून केल्याची कबुली दिली.
या गुन्ह्याचा उलगडा परिमंडळ ११ चे उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके, एम. एच. कॉलनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपट येळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विजय धोत्रे, पोलीस उपनिरीक्षक डॉ. दीपक हिंडे, पोलीस हवालदार प्रवीण जोपळे, पोलीस नाईक दीपक मगदूम, पोलीस नाईक तानाजी मोरे, पोलीस नाईक विनोद उगले, महिला पोलीस अंमलदार जोत्सना कदम आदी पथकाने केला.
No comments:
Post a Comment