पुणे माझा न्यूज : प्रतिनिधी इम्रान पुनावाला पुणे : पुण्यातील पोलीस आयुक्तलयाच्या गेटबाहेर एका तरुणानेअंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन तो तरुण थेट पोलीस आयुक्तालयात पळाला हि घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली असून इतकी भयानक होती कि, पेटलेल्या अवस्थेत त्याने आयुक्तालयात धाव घेतल्याने एकच खळबळ उडाली
नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे कि, या तरुणाने चारित्र्य पडताळणी होणाऱ्या त्रासामुळे कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा सुरु आहे. सुरेश विठ्ठल पिंगळे असे पोलीस आयुक्तालयात पेटवून घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव समोर आले आहे. सुरेशला पासपोर्ट काढून नोकरीसाठी बाहेर देशामध्ये जायचे होते. पेटलेल्या अवस्थेत आयुक्तालयात शिरल्याने गोंधळ उडाला गुन्हे शाखा आणि प्रवेशद्वारावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.हा सर्व प्रकार परिमंडळ चारच्या एका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्यामुळे हे प्रकरण घडल्याचे कळत आहे. या प्रकराणावर पोलीस आयुक्त कोणती भूमिका घेतील याची वाट पाहावी लागणार आहे
No comments:
Post a Comment