रिक्षामध्ये पॅसेंजर म्हणुन बसवुन लुटमार करणा-या ०४ सराईत आरोपींना सहकारनगर पोलीसांनी केली शिताफीने अटक
पुणे माझा न्यूज पुणे : इम्रान पुनावाला क्राईम रिपोर्टर : दत्तनगर, कात्रज, पुणे हे दि.०२/०७/२०२१ रोजी दुपारचे वेळी मार्केटयार्ड पुणे येथुन आहिल्यादेवी चौक बालाजीनगर पुणे येथे जाण्यासाठी पॅसेंजर म्हणुन रिक्षात बसले. प्रवासादरम्यान त्यांना रिक्षा चालक व त्याचे तीन साथीदारांनी धक्काबुक्की करुन त्यांची सोनयाची चैन काढून घेतली.
सदरबाबत सेलवन पिल्ले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र.नं. १८६/२०२१ भा.द.वि. कलम ३७९ ३४ प्रमाणे सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. दाखल गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती देसाई व श्री युनुस मुलानी पोलीस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे यांचे अधिपत्याखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री सुधीर घाडगे व तपास पथकातील पोलीस अंमलदार करीत असताना सिसिटीव्ही फुटेजवरुन व पोलीस अंमलदार संदीप ननवरे व सागर शिंदे यांना बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, दाखल गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा करताना रिक्षा क्र. एम. एच. १४ एच. एम. / ७२९० हिचा वापर केला असुन ते सदर रिक्षामध्ये शिवनेरी नगर कोंढवा पुणे येथे बसलेले आहे. सदरबाबत मा वरिष्ठांना कळवून तात्काळ स्टाफसह खाजगी वाहनाने बातमीतील ठिकाणाजवळ येवुन पाहता बातमीतील वर्णनाचे ०४ इसम मध्ये नमुद क्रमांकाचे रिक्षामध्ये बसलेले दिसले. त्याप्रमाणे खात्री होताच त्यांना सापळा लावुन ताब्यात घेवून त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी आपले नाव १) वशिम अजमल खान, वय ३१ वर्षे, रा. गल्ली नं. ३. शिवनेरी नगर, कोढवा खु.पुणे. मु.पो. सातीबाजार चौक, नसीराबाद, ता.जि. जळगाव २) मोसिन खान नुर खान पठाण, वय २८ वर्षे, रा. मु. पो. सुरेशदादा जैननगर, गेंदालाल मिल जवळ, हुडको (पिप्राळा) ता.जि.जळगाव, ३) अन्सार आयुब खान, वय ३२ वर्षे, रा. शिवनेरी नगर, गल्ली नं.३ फातिमा मस्जिद जवळ, कोंढवा, पुणे ४) अब्दुल करिम वाशिकर, वय २६ वर्षे, रा.गल्ली नं. १०, घोरपडी वस्ती, लोणी काळभोर, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे दाखल गुन्हयाबाबत चौकशी करता त्यांनी चौघांनी मिळुन त्यांचेकडील वरील रिक्षेचा वापर करुन दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली नमुद आरोपीना सहकारनगर पोलीस स्टेशन येथे आणुन दाखल गुन्हयात अटक केली आहे.
दाखल गुन्हयात निष्पन्न झालेले वर नमुद आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांनी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता असुन त्यादृष्टीने तपास चालु आहे. नमुद आरोपींकडुन सोन्याचे मालासह एकुण १,०१०००/ रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशीक विभाग, डॉ. श्री. संजय शिंदे सो पोलीस उपायुक्त, परिमंडळ २. श्री. सागर पाटील सो०, सहा पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग सुषमा चव्हाण सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री युनुस मुलानी यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस हवालदार बापु खुटवड, पोलीस नाईक प्रकाश मरगजे. संदिप ननवरे, सतिष चव्हाण, भुजंग इंगळे, पोलीस शिपाई सागर शिंदे, महेश मंडलिक, प्रदिप बेडीस्कर यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment