पुणे माझा न्युज - क्राईम रिपोर्टर इम्रान पुनावाला : पुणे वार्ता आकाश मोहन चौधरी, हे राहणार यशवंतराव चव्हाणनगर दत्तमंदीराजवळ धनकवडी पुणे यांना दि.०६/०७/२०२१ रोजी सिगारेट पिण्याचे भांडणाचे कारणावरून लोखंडी कोयता, हॉकी स्टिकने मारहाण करुन जबर जखमी केले होते हा गुन्हा करून आरोपी फरार होते याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या
अधिक माहिती अशी कि, दाखल गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती देसाई व श्री युनुस मुलानी पोलीस निरीक्षक (गुन्हे) सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे यांचे अधिपत्याखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर घाडगे व तपास पथकातील पोलीस अंमलदार करीत असताना पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे यांना त्यांचे बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, दाखल गुन्हयामध्ये फिर्यादी यांना आरोपी नामे १) संकेत कसबे २) मानव ढमाले ३) वैभव ढमाले यांनी मारहाण केली आहे. त्यापैकी १) मानव ढमाले २) वैभव ढमाले हे जेधे चौक स्वारगेट येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी येणार आहेत असे समजले. त्यानुसार लागलीच पोलीस उपनिरीक्षक श्री सुधीर घाडगे व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी दोन टिम बनवुन बातमीचे ठिकाणी जावुन सापळा रचुन वर नमुद आरोपींना हत्यारांसह ताब्यात घेवुन अधिक चौकशी कामी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे आणुन दाखल गुन्हयात अटक केली आहे.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, डॉ. श्री. संजय शिंदे सो पोलीस उपायुक्त, परिमंडळ-२ श्री. सागर पाटील सौा, सहा पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग सुषमा चव्हाण सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. युनुस मुलानी यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस हवालदार बापु खुटवड, पोलीस नाईक प्रकाश मरगजे. संदिप ननवरे, सतिष चव्हाण, भुजंग इंगळे, पोलीस शिपाई महेश मंडलिक, सागर शिंदे, प्रदिप बेडीस्कर यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment