Coronavirus: महानगर पालिकेचा उपक्रम विश्रांतवाडी येथील जय गणेश विश्व कॉम्प्लेक्स मधील व्यापाऱ्यांची अँटीजेन टेस्ट मोहीम; - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Thursday, 15 July 2021

Coronavirus: महानगर पालिकेचा उपक्रम विश्रांतवाडी येथील जय गणेश विश्व कॉम्प्लेक्स मधील व्यापाऱ्यांची अँटीजेन टेस्ट मोहीम;

टेस्टशिवाय दुकान उघडले तर फौजदारी गुन्हे नोंद होणार आहेत. 

पुणे शहर प्रतिनिधी इम्रान पुनावाला : पुण्याजिल्ह्यातील वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाला आळा घालण्यासाठी सुपर स्प्रेडरची (व्यवसायिक/व्यापारी) अँटीजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच टेस्टशिवाय दुकान उघडले तर फौजदारी गुन्हे नोंद होणार आहेत. दरम्यान, शहरात महानगर पालिके तर्फे अँटीजेन टेस्ट मोहिम सुरु करण्यात आली आहे ठीक ठिकणी जाऊन व्यापारी वर्ग आणि तेथील कर्मचारी यांची चाचणी करणार आहेत

या मोहिमेसाठी व्यापारी - व्यवसायिक संघटनांनुसार तपासणी केंद्रांचे नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक केंद्रांवर साधारण १०० ते २०० लोकांची तपासणी केली जाणार आहे. मधल्या काळात आटोक्यात आलेल्या कोरोना विषाणू संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढू नये यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे मागच्या काही दिवसांत रुग्णसंख्या शंभराच्या घरात आहे
या मोहिमेत विश्रांतवाडी येथील जय गणेश विश्व कॉम्प्लेक्स मधील व्यापाऱ्यांची चाचणी करण्यात झोनल अधिकारी डॉ. माया लोहार यांनी पुणे माझाच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले

No comments:

Post a Comment

Post Top Ad