पुणे माझा न्यूज: प्रतिनिधी,पुणे दि. ६ मार्च :- पुणे जिल्यात कोरोनाचा वाढता प्रदुभाव लक्षात घेऊन, कोरोनाची साखळी तोडण्यास राज्य शासन युद्ध पातळीवर नियोजन करीत असताना दिसत आहे तर काहीजण विना कारण नियमांचे उल्लंघन करत आहेत. अशा लोकांवर पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाणार आहे. वाहन चालकाचा वाहन परवाना (लायसन्स) जप्त करण्यात येणार असल्याचे सह. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले आहे. या कारवाई मुळे कुठे न कुठे कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, नियमांचे पालन करावे आणि सोशल डिस्टसिंग पाळावे, असे आवाहन सह पोलीस आयुक्त शिसवे यांनी केले आहे.
पुणे शहरात कोरोना झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू असूनही काहीजण विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र दिसत आहे. तर काही ठिकाणी अत्यावश्यक सेवेच्या नावावर फिरताना दिसत आहे. पोलीस गेली दोन तीन दिवस नागरिकांना प्रेमाने आवाहन करीत होते
पण नागरिकांनी पाहिजे तसा प्रतिसाद देत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता पोलिसांनी आजपासून कडक कारवाई करण्याचे धोरण हाती घेतले आहे. शिवाय विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर वचक बसवा म्हणून त्यांचे वाहन परवाना (लायसन्स) जप्त करण्यात येणार आहे यामुळे अत्यावश्यक सेवा किंवा खरच गरजेसाठी बाहेर पडणाऱ्यांना देखील त्रास होणार असल्याचेही सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विनाकारण न फिरण्याचे आवाहन करण्यात आले आहे
The suffering of a damaged farmer in Satara district |सातारा जिल्ह्यातील एका नुकसान झालेल्या शेतकऱ्याची व्यथा
बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा
https://youtu.be/iUKqYCiOre4
दुसरीकडे गेल्या वर्षी कोरोना काळात एसपीओची (SPO- विशेष पोलीस अधिकारी) मदत घेण्यात आली होती. आता यावेळी देखील त्यांची मदत घेतली जाणार आहे. नाकाबंदी तसेच बंदोबस्त आणि पेट्रोलिंग करीता विशेष पोलीस मदत करणार आहे. अडीच हजाराहून अधिक पोलीस अधिकारी तैनात करण्यात येणार असल्याचे शिसवे यांनी सांगितले आहे
No comments:
Post a Comment