पुणे माझा न्युज प्रतिनिधी पुणे : दिनांक २५/०५/२०१९ रोजी येरवडा पोलीस स्टेशन हददीत, डॉन बॉस्को शाळेच्या मागे, बंगला नं. ९, कारागृह महानिरीक्षणालय, येरवडा, पुणे येथील बंद गेटचे आतील बाजूस कचराकुंडी जवळ, झुडूपामध्ये एक अनोळखी पुरूषाचा मृतदेह संशयीतरित्या मिळुन आला त्याबाबत सदर मयत इसमाचा खून केल्याबाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दाखल गुन्हयातील अनोळखी मयत इसमाचा व अज्ञात आरोपीचा तपास वरिष्ठांचे आदेशान्वये तपास पथकाचे अधिकारी सपोनि समीर करपे व अंमलदार तपास करीत होते. दिनांक ०५/०४/२०२१ रोजी तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. समीर करपे व पोलीस नाईक अमजद शेख यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सदरचा खुन हा कुणाल जाधव उर्फ राजा, राकेश भिसे उर्फ गंदया व निखील यादव उर्फ एनवाय या तिघांनी केला आहे. सदरची बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन पुणे यांना कळविल्याने त्यांनी स्वतः सोबत तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक समीर करपे व पोलीस अंमलदार यांनी कुणाल किसन जाधव उर्फ राजा, रा. खराडी, पुणे. राकेश बापु भिसे उर्फ गंदया रा. लक्ष्मीनगर येरवडा, पुणे यांना दाखल गुन्हयात ताब्यात घेउन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी सदरचा मयत इसमाचे नाव देवा रा.ठी ब्रम्हाशील, लोहगांव, पुणे हे असुन दारु पिण्याकरीता पैसे न दिल्याच्या कारणावरुन वादावादी झाल्याने त्याचा खुन केला होता असे सांगितले. सदर दोन्ही आरोपीतांना अटक केली असुन त्यातील निखील तुळशीराम यादव उर्फ एन वाय हा सध्या येरवडा कारागृहात आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास युनूस शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन पुणे हे करत आहेत.सदरची कारवाई मा. श्री. नामदेव चव्हाण सो., अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे. मा. श्री. पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त साो, परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्री. किशोर जाधव, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. युनूस शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अजय वाघमारे पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे अधिकारी श्री समीर करपे, सहा पोलीस निरीक्षक, सहा. पो. फौज. प्रदीप सुर्वे, बाळासाहेब गायकवाड, पो. हवा. गणपत थिकोळे, पोलीस नाईक अमजद शेख, तुषार खराडे, नवनाथ मोहिते, गणेश वाघ, पो. कॉ. अनिल शिंदे, सुनिल नागलोत, समीर भोरडे, रुपेश तोडकर, संजय भरगुडे, अजय पडोळे,राहूल परदेशी, विनायक साळवी यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment