पुणे माझा न्युज प्रतिनिधी : टिकटॉक स्टार अभिनेता समिर गायकवाड यांनी घरातील पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल (रविवारी) संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीत घडली आहे.
अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी त्यांचा चुलत भाऊ प्रफुल्ल गायकवाड यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास केसनंद रस्त्यावरील मिकासा इमारतीत टिकटॉक स्टार अभिनेता समिर गायकवाड यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार लोणी कंद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत समीरला रुग्णालयात दाखल केले.
No comments:
Post a Comment