पुणे माझा न्यूज प्रतिनिधी फैयाज मुल्ला : विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुरनं २५/२०२१ भा.द.वि.क. ४५४,४५७,३८०,३४ प्रमाणे दि. २४/०१/२०२१ रोजी दाखल असून दाखल गुन्हयात १०.८१,४८४/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्याने पोलीस अंमलदार प्रफुल मोरे व संदिप देवकाते, शेखर खराडे, अझरुदरदीन पठाण यांनी घटनास्थळावरील टेक्नीकल बाबी हस्तगत करून एक पांढऱ्या रंगाची एक्सव्हीयु कार
संशयीत आल्याचे निष्पन्न करून सदर वाहनाचा मार्ग काढून सदरचे वाहन हे येरवडा, हडपसर मार्गे पुणे सोलापूर रोडने सोलापूर कडे गेल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अंमलदार दिपक चव्हाण, प्रफुल मोरे, संदिप देवकाते व शेखर खराडे यांनी सोलापूर येथे जावून सदर वाहन क्रमांक मिळवून वाहनाची माहिती घेवून सदरचे वाहन हे हुसेन शिवाजी गायकवाड रा. सेटलमेन्ट कॉलनी, सोलापूर हा वापरीत असल्याची माहिती प्राप्त केली संशयीत इसम नामे हुसेन शिवाजी गायकवाड याचेबाबत माहिती काढली असता त्याचेवर कर्नाटक व सोलापूर येथे एकण ३० ते ४० चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे समजले त्यानंतर पोलीस हावालदार दिपक चव्हाण व पोलीस अंमलदार
संदिप देवकाते यांनी त्यांचे बातमीदारामार्फत माहिती काढून सदर संशयीत इसम नामे हुसेनी शिवाजी गायकवाड हा त्याचे साथीदाराबरोबर हैद्रा, सोलापूर येथे दि. ११/०२/२०२१ रोजी येणार असल्याने सदर ठिकाणी पोलीस उप निरीक्षक श्री लहु सातपुते, पोलीस अंमलदार दिपक चव्हाण, प्रफुल मोरे व संदिप देवकाते यांनी हैद्रा, ता अक्कलकोट, जि. सोलापूर येथे जावून सापळा लावून थांबले असता त्यांना एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची एक्सव्हीयु ही संशयीत कार येताना दिल्याने त्यांनी सदरची कार थांबवून कारमधील संशयीत चार इसमांना ताब्यात घेतले त्यांना त्यांची नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) हुसेन शिवाजी गायकवाड वय ४५ वर्षे, रा. फ्री कॉलनी नं ६, सेटलमेंन्ट, सोलापूर २) आदर्श अरुण गायकवाड वय २४ वर्षे, रा. फ्री कॉलनी नं ६, सेटलमेंन्ट, सोलापूर ३) लक्ष्मण गुरप्पा हेळवार वय २२ वर्षे, रा. पंचशिलनगर, ता. इंडी, जि. विजापूर, राज्य कर्नाटक ४) राज दत्ता जाधव वय २६ वर्षे, रा. फॉरेस्ट नाका, हनुमान मंदिर जवळ कल्याण बदलापूर रोड, अंबरनाथ वेस्ट, जि. ठाणे असे असल्याचे सांगीतले सदर वाहनाची तपासणी करता गाडीमध्ये एक लोखंडी कटावनी मिळून आल्याने त्यांचा संशय आल्याने त्याना तपासकामी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे घेवून आले त्यानंतर त्यांचेकडे पुन्हा तपास करता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करून त्यांचेकडून एकुण ९.८३,४८४/- रुपयाच मुददेमाला सोन्याचे दागीने व महिंद्रा कंपनीची एक्स यु व्ही कार असा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री.नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. पंकज देशमुख, पोलीस उप- आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, मा. श्री गलांडे, सहा.पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे, मा. श्री अजय चांदखेडे, व्पोनि विश्रांतवाडी तसेच मनिषा झेंडे पो नि गुन्हे, सपोनि एस पी यादव, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी श्री लहु सातपुते पो.हवा. दिपक चव्हाण पो.ना. यशवंत किर्वे, उत्तम गट, किशोर दुशिंग, अझरुददीन पठाण, पो.शि प्रफुल मोरे, अनिकेत भिंगारे, शेखर खराडे, संदिप देवकाते, सतीश मुंडे यांचे पथकाने केली आहे.
No comments:
Post a Comment