पुणे माझा न्यूज प्रतिनिधी : ०९ जाने २०२१ :- बहुप्रतिक्षित भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेतून आज पासून पूर्व भागाला पाणी पुरवठा सुरू होणार आहे. त्यामुळे आता लोहगावकारांना आठ दिवसांऐवजी तीन दिवसांनी पाणी मिळेल अशी माहिती आमदार सुनील टिंगरे यांनी पुणे माझा न्यूजला दिली.
या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शनिवारपासून भामा आसखेडचे प्रत्यक्षात नागरिकांना मिळण्यास सुरवात होणार आहे. तीन टप्यात या पाणी पुरवठ्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
त्यानुसार पहिल्या टप्यात आजपासून संपूर्ण धानोरी आणि लोहगाव भागाला पाणी मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यात विश्रांतवाडी आणि विमाननगर भागाला पाणी पुरवठा केला जाईल. सद्य:स्थितीत लोहगाव भागात सर्वाधिक पाणी टंचाई असून आता आठ दिवसांनी पाणी मिळत आहे. हा कालावधी तीन ते चार दिवसांवर येईल. त्यानंतर तिसऱ्या टप्यात फुलेनगर, प्रतिकनगर, नागपूर चाळ, हाऊसिंग बोर्ड या भागाला पाणी पोहचेल आणि शेवटच्या येरवडा, टिंगरेनगर, कळस यासह उर्वरित भागाला पाणी मिळेल अशी माहिती आमदार सुनील टिंगरे यांनी दिली.
No comments:
Post a Comment