पुणे माझा न्युज प्रतिनिधी - ८ जाने २०२१ : भाजीपाला विक्रेता व हातगाडी चालक यांच्याकडून करत होते हप्ते वसूली व या भामट्यांनी विमान नगर, वडगाव शेरी, चंदन नगर, येरवडा या ठिकाणी लोकांना सतत त्रास देण्यास सुरुवात केली होती यांच्या अनेक तक्रारी देखील वरिष्ठांना कडे करण्यात आल्या होत्या तरी देखील यांनी आपली नीतिमत्ता नाही बदलली वरिष्ठ नेहमी यांना पाठीशी घालत होते हे दोघे ठेकेदार पध्दतीने काम करत असल्याचे आले समोर आले आहे
काल दिनांक ८ जानेवारी २०२१ रोजी अतिक्रमण विभागाने उचललेल्या वाहनांची व इतर मालाची सोडवणूक करण्यासाठी नागरिकांकडून पैसे वसूली करणा-या पुणे महानगर पालिकेच्या दोन भामट्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे घेताना रंगेहाथ पकडले
विक्रेता आणि हातगाडी मालक यांनी सुटकेचा श्वास सोडला. या कारवाईत विलास शिवाजी अभंगे आणि ऋतिक वाळके अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही ठेकेदार पध्दतीने काम करणारे खासगी इसम आहेत. हे सतत अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली गरीब व हातावर पोट असणाऱ्या विक्रेत्यांना त्रास देऊन हफ्ते गोळा करत अशीच अतिक्रमण कारवाई येरवडा परिसरात केली होती या कारवाई दरम्यान पालिका अतिक्रमण विभाग फुटपाथवर गाडी लावल्यानंतर त्या गाड्यावर कारवाई करते. आणि या गाड्या सोडवण्यासाठी या दोन भामट्यांनी यावेळी पथारी व्यावसायिकांकडून गाड्या सोडून देण्यासाठी म्हणून प्रत्येकी ४,०००/- हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी पुणे माझा न्यूजला दिली
No comments:
Post a Comment