पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी,वडगावशेरी विधानसभा तर्फे रोजगार मेळावा व कोरोना योद्धा यांचे सत्कार - समिर मोहीद्दीन शेख अध्यक्ष:-वडगावशेरी विधानसभा - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Monday, 25 January 2021

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी,वडगावशेरी विधानसभा तर्फे रोजगार मेळावा व कोरोना योद्धा यांचे सत्कार - समिर मोहीद्दीन शेख अध्यक्ष:-वडगावशेरी विधानसभा

पुणे माझा प्रतिनिधी: येरवडा - "समाजाला खर्‍या अर्थाने दिशा देण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नितांत गरज असल्याचे मत आझम कॅम्पस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी व्यक्त केले. 

येरवडा परिसराच्या  प्रगतीसाठी विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणासोबतच अत्याधुनिक संगणकाचे ज्ञान देणे आवश्यक आहे. त्यासाठी  सर्वतोपरी सहकार्य करू"  असे आश्वासन डॉ. इनामदार यांनी यावेळी दिले. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वडगाव शेरी विधानसभा अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने आयोजित "रोजगार मेळावा व सर्वधर्मीय कोराना योद्धा गौरव समारंभ" कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार सुनील टिंगरे, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, अल्पसंख्यांक विभाग प्रदेश उपाध्यक्ष हाजीभाई नदाफ, मागासवर्गीय विभाग  प्रदेश उपाध्यक्ष भुजंग लव्हे, नगरसेवक अविनाश बागवे, माजी नगरसेवक शिवाजी क्षीरसागर, राजेंद्र शिरसाट, जॉन पॉल, वडगावशेरी अध्यक्ष रमेश सकट,राष्ट्रवादीचे शैलेश राजगुरू  कार्यक्रमाचे संयोजक वडगावशेरी काँग्रेस अल्पसंख्यांक अध्यक्ष समीर मोहिद्दीन शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 


 वडगावशेरी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये 950 बेरोजगार युवक-युवतींनी नोंदणी केली होती. त्यामधील 360 मुलाखती घेण्यात आल्या. 12 कंपन्यांनी 140 बेरोजगार युवक-युवतींना जागेवर नोकऱ्या देण्यात आल्या. तसेच येरवडा परिसरातील 61 सर्वधर्मीय संस्था, संघटना, कार्यकर्ते यांना "कोरोनायोद्धा" म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आल्याची माहिती संयोजक समीर शेख यांनी दिली. समाजातील संधी उपलब्ध करून देण्याचा वडगावशेरी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने आयोजित  रोजगार मेळावा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत आमदार सुनील टिंगरे यांनी व्यक्त केले. 

 याच कार्यक्रमात कोरोना संक्रमण कालावधीत कार्य करणारे येरवडा परिसरातील डॉ. सुनील सोनवणे, डॉ. प्रकाश ओझर्डेकर, डॉ.अंजुम शेख, शिक्षक विलास गायकवाड, शिक्षिका शबाना अरब, एम. सी.ए. सोसायटीचे  संचालक अली इनामदार यांच्यासह येरवडा नागरीक  कृती समिती, समस्त गावकरी मंडळ येरवडा गाव, नवी खडकी देवस्थान ट्रस्ट, जय जवाननगर गुरुद्वारा, राम मंदिर रामनगर, ख्रिस्त विश्व मंडळ येरवडा, प्रज्ञासागर बुद्धविहार, शादावलबाबा दर्गा ट्रस्ट, नूरानी मशीद, बजमे रहमत, बजमे-नुरे-इलाही, नमरा मशीद  या संस्थांचा तसेच रहमान फाउंडेशन व कोरोना मृतांवर संस्कार करणारे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांचा  कार्यक्रमात "कोरोना योद्धा" विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वडगावशेरी काँग्रेस अल्पसंख्यांक उपाध्यक्ष आसिफ शेख यांनी केले.

फोटो ओळ - वडगावशेरी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग आयोजित रोजगार मेळावा सर्वधर्मीय कोरोनायोद्धा सन्मान सोहळ्यात मार्गदर्शन करताना डॉ. पी. ए. इनामदार यावेळी उपस्थित इतर मान्यवर

No comments:

Post a Comment

Post Top Ad