Pune Police | परिमंडळ ५ मध्ये गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गर्दी नियोजन व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Saturday, 23 August 2025

Pune Police | परिमंडळ ५ मध्ये गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गर्दी नियोजन व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

परिमंडळ ५ मध्ये गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गर्दी नियोजन व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण


पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : दिनांक २७/०८/२०२५ ते ०६/०९/२०२५ रोजीचे दरम्यान आगामी गणेशोत्सव सर्वत्र साजरा होणार आहे. गणेशोत्सव काळामध्ये होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन व नियोजन करण्यासाठी पुणे शहरातील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, स्वयंसेवक व गणेश मंडळांचे कार्यकर्ते नागरिक यांचे प्रशिक्षण घेण्याबाबत पोलीस आयुक्त यांचे आदेश प्राप्त झाले होते.

त्या अनुषंगाने परिमंडळ ५ कार्यक्षेत्रामध्ये गणेशोत्सव बंदोबस्त सुरळीत पार पाडण्यासाठी गर्दी नियोजन व आपत्ती व्यवस्थापन या विषयावर दिनांक २३/०८/२०२५ रोजी ११:०० वाजता जांभूळकर गार्डन, वानवडी, पुणे येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.




सदर प्रशिक्षक श्री. राजीव चौबे, रिसीलेंट इंडिया, नाशिक, जिल्हा नाशिक यांनी यापूर्वी आषाढी व कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथील गर्दीचे तसेच नाशिक येथील कुंभमेळयातील गर्दीचे प्रशिक्षण पोलीसांना दिलेले आहे.

परिमंडळ ५ मधील १०० पोलीस अधिकारी, ५०० पोलीस अंमलदार, ४०० स्वयंसेवक व गणेश मंडळांचे कार्यकर्ते नागरिक यांना गर्दी नियोजन व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले.

सदर प्रशिक्षणा दरम्यान पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांनी उपस्थितांना कोणत्याही स्वरुपाच्या गर्दीचे व्यवस्थापन करत असताना लोकांचा जाण्याचा व येण्याचा मार्ग वेगळा असला पाहिजे, कुठेही क्रॉस फ्लो होऊ नये, पोलीसांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले पाहिजे, गणेश मंडळांकडे गर्दी नियंत्रणासाठी रस्सी, बॅरिकेड व स्वयंसेवक असले पाहिजेत, असे आवाहन त्यांचे मार्गदर्शनात केले

No comments:

Post a Comment

Post Top Ad