पुण्यातील कोंढवा पोलिसांनी एका खून प्रकरणातील आरोपींना अवघ्या दोन तासांत केली अटक
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : दि. ११/०५/२०२५ रोजी सायंकाळी १८:०० वा चे सुमारास कोंढवा पोलीसांना माहिती मिळाली की, ज्योती हॉटेल समारील मोकळ्या जागेत एक इसम रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडलेला आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे रऊफ शेख, पोलीस निरीक्षक गुन्हे नवनाथ जगताप, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोहवा/निलेश देसाई, पोहवा/सतिश चव्हाण, पोहवा/विशाल मेमाणे, पो.अं. / लक्ष्मण होळकर, पो.अं./ सुजित मदन, पो.अं./संतोष बनसुडे, पो.अं. / सैफ पठाण, पो. अं/अभिजीत जाधव, पो.अं. अभिजीत रत्नपारखी, पो.अं. / विकास मरगळे असे घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी एक इसम रक्ताचे थारोळ्यात निपचीत पडलेला दिसून आला. पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सदर इसमाच्या डोक्यात दगड मारून त्याचा निघून खून केल्याचे पोलीसांचे लक्षात आले.
पोलीसांनी सदर इसमाचे कपड्यांची झडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशात मिळून आलेल्या ओळखपत्रावरून त्याचे नाव सुभाष रघुवीर परदेशी, वय ५४ वर्षे, रा. गोकुळनगर, गल्ली नं ०३, कोंढवा बु., पुणे असे असल्याचे दिसून आले. पोलीसांनी त्याच्या पत्नीशी संपर्क केला असता सदर मयत सुभाष रघुवीर परदेशी हे रात्री त्यांचे मित्र नामे १) अभय कदम व २) बादल शेरकर यांच्या बरोबर गेला असून तो अद्याप घरी आलेला नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीसांनी वेगाने तपासाची सुत्रे फिरवली असता तपास पथकातील पोलीस अंमलदार विशाल मेमाणे यांना त्यांच्या बातमीदाराकडुन बातमी मिळाली की सदर चे इसम हे उत्तमनगर परीसरात अभय कदम याच्या भावाच्या घरी असल्याची माहिती मिळाली सदर इसमांना उत्तमनगर येथील अहीरेगेट येथुन इसम नामे १) अभय जगन्नाथ कदम वय २४ वर्षे, रा. तालीम चौक, भैरवनाथ आळी, कोंढवा खुर्द पुणे व गल्ली नंबर १४, श्री गणेश अपार्टमेन्ट, भाग्योदय नगर, कोंढवा पुणे २) बादल शाम शेरकर, वय २४ वर्षे, रा. सर्वे नंबर ३५४, बधे चाळ, भैरवनाथ मंदिर मागे, कोंढवा खुर्द पुणे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलीसांनी केलेल्या तपासादरम्यान त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी पोलीसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्हा केल्याचे मान्य केले. मयत सुभाष रघुवीर परदेशी याने आजारपणाच्या नावाखाली आरोपी यांच्याकडून पाच लाख रूपये हात उसने घेतले होते. परंतू तो पैसे परत देत नसल्याच्या रागातून आरोपी यांनी त्याच्या डोक्यात दगडाने मारून त्याचा निर्धन खून केल्याचे सांगितले. मयताची पत्नी नामे हेमलता सुभाष परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी यांचे विरोधात कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि क्रमांक ३८२/२०२५ भारतीय न्याय संहीता सन २०२३ चे कलम १०३ (१),३५१ (२), (३) ३५२.३(५) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी यांना अटक केली आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त साो., मा. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त साो., श्री रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त साो., पुर्व प्रादेशिक विभाग श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त साो., परिमंडळ ५, राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त साो., वानवडी विभाग, श्री धन्यकुमार गोडसे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो., विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री रऊफ शेख, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री नवनाथ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोहवा/विशाल मेमाणे, पोहवा/निलेश देसाई, पोहवा/गोरखनाथ चिनके, पो.हवा/सतिश चव्हाण, पो.अं./ लक्ष्मण होळकर, पो.अं./सुजित मदन, पो.अं./ संतोष बनसुडे, पो.अं./ सैफ पठाण, पो. अं/अभिजीत जाधव, पो.अं. / अभिजीत रत्नपारखी, पो.अं. / विकास मरगळे यांच्या पथकाने केली आहे.
No comments:
Post a Comment