जीवे मारण्याची धमकी देत १० लाखाची खंडणी मागणाऱ्या आरोपीला बिबवेवाडी पोलीसांनी केली अटक
पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : व्यावसायीकास बदनामी व त्याचे कुटुंबास जिवे मारण्याची धमकी देवून १० लाखाची खंडणी मागून ती स्विकारणाऱ्या खंडणीखोराच्या बिबवेवाडी पोलीसांनी रंगेहात पकडून मुसक्या आवळल्या अधिक माहिती अशी की, बिबवेवाडी पुणे येथील व्यवसायीक गौरव प्रमोद दुगड, रा. वसंतबाग सोसायटी, बिबवेवाडी पुणे यांना त्यांचे मोबाईलवर त्यांचेकडील ड्रायव्हर अमित दत्तात्रय थोपटे, रा. गुरूदत्त अपार्टमेंट बालाजीनगर, धनकवडी पुणे याने तक्रारदार यांचे वडीलांचे मोबाईल मधून अश्लिल मॅसेज स्वतःचे मोबाईलमध्ये पाठवून त्याचे स्क्रिनशॉट काढले व ते स्क्रिनशॉट तक्रारदार यांना पाठवून त्यांची बदनामी करण्याची व कुटुंबाला जिवे ठार मारणेची धमकी देवून १० लाख रुपयाची खंडणी मागितल्याची तक्रारदाराने तक्रार दिली. तक्रारदाराचे तक्रारीत तथ्य वाटत असल्याने बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तपास पथकाने खात्री करून तात्काळ सापळा रचला. त्याच वेळी आरोपीने तक्रारदार यांना फोनवर मॅसेज करून खंडणी मागितली व खंडणीचे पैसे घेवून पुष्पा हाईट्स, दुसरा मजला, पुष्पमंगल चौक, पुणे येथे येण्यास कळविले.
त्यावेळी बिबवेवाडी पोलीसांनी सापळ्याची तयारी केली व खंडणीखोरास देण्यासाठी डमी व चलनी नोटा तयार ठेवून आरोपीस मोबाईल फोनद्वारे पैसे जमा केल्याचे मॅसेज पाठवून दिले. त्यावर आरोपी वरील ठिकाणी खंडणीचे पैसे घेण्यासाठी येणार असल्याची खात्री झाल्याने सदरबाबत राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ-५ यांना माहिती देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीसांनी साध्या वेशात जावून सदर खंडणीखोरास खंडणीची रक्कम घेताना रंगेहात पकडले. त्यास त्याचे नाव पता व खंडणी मागणेचे कारण विचारले. त्याने मार्केटमध्ये उधारी झाली असल्याने व देणे जमत नसल्याने खंडणी मागितल्याचे सांगितले. आरोपीने स्विकारलेली खंडणीची रक्कम पंचनामा करून व आरोपीस ताब्यात घेतले. सदर घटनेबाबत बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं ६८ / २०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०८ (५) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीस लागलीच अटक करून मा.न्यायालयात रिमांड रिपोर्टसह हजर केले असता मा. न्यायालयाने दि. ३१/०३/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
सदरची यशस्वी कामगिरी डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे, तपास पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक अशोक येवले, पोलीस हवा. संजय गायकवाड, संतोष जाधव, पो.शि. सुमित ताकपेरे, प्रणय पाटील, ज्योतिष काळे, रक्षित काळे, शिवाजी येवले, विशाल जाधव, दत्ता शेंद्रे, निलेश पाटील यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment