National Tennis Cricket Tournament | सुरगाणा तालुक्यातील ओम किरण कर्डिले याची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Tuesday, 19 September 2023

National Tennis Cricket Tournament | सुरगाणा तालुक्यातील ओम किरण कर्डिले याची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

 सुरगाणा तालुक्यातील ओम किरण कर्डिले याची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड


पुणे माझा न्युज । प्रतिनिधी : बोरगाव : टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व धाराशिव टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवी सब ज्युनिअर  टेनिस क्रिकेट चॅम्पियनशीप स्पर्धा के ,के. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज येथे पार पडल्या यात ओम किरण कर्डिले याची राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत सुरगाणा तालुक्यात फक्त कबड्डी आणि खो खो याच खेळात आजपर्यंत तालुक्यातील खेळाडूचे वर्चस्व होते 

 

 पण खेळाची आवड तालुक्यातील विविध विद्यार्थ्यांना लागली असल्याने क्रिकेट या खेळामध्ये निवड झालेला आजपर्यतचा तालुक्यातील हा प्रथमच खेळाडू असून ओम हा जनकल्याण माध्यमिक विद्यालय शिंदे दिगर तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक येथे इयत्ता दहावी मध्ये तो शिकत आहे. त्याच्या निवडीबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र वुमन डायरेक्टर धनश्री गिरी, नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड,. धनंजय लोखंडे,विलास गिरी ,शाळेचे मुख्याध्यापक श्री गंगाराम पवार, शेवाळे अविनाश पवार व घाटमाथा परिसरातील क्रिकेट टिम व पालक किरण कर्डिले यांनी अभिनंदन केले व पुढील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


No comments:

Post a Comment

Post Top Ad