पुणे माझा न्युज | प्रतिनिधी : दरवर्षी प्रमाणे रमजान महिन्यात विविध व्यवसाय सुरु केले जातात यात खास करून जास्त प्रमाणात हॉटेल सुरु करत असतात तर काहीजण जागा भाडे तत्वावर घेऊन आपला व्यवसाय थाटतात हा व्यायसाय फक्त रमजान महिन्यापुरता चालू असतो त्यावर ते आपली उपजीविका जगत असतात अशातच भाईगिरी करणारे किंवा दमदाटी करणारे सर्रास पणे अशा दुकान चालकांना कारण नसताना अडवणूक करत असतात असाच प्रकार कोंढवा येथील पारगे नगर मध्ये घडला आहे हॉटेल चालकाने हॉटेल बाहेर मंडप टाकल्याने ३ लाखांची खंडणी मागणार्या समीर शफी पठाण व त्याचा साथीदार अन्वर अशा दोघा गुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मार्केटयार्ड येथे राहणार्या एका ४९ वर्षाच्या व्यावसायिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३४६/२३) दिली आहे. हा प्रकार फिर्यादीचे हॉटेलजवळ व आरोपीच्या ऑफिसमध्ये १५ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ७ व रात्री ९ वाजता घडला. फिर्यादी यांनी कोंढवा परिसरातमध्ये रमजान महिन्यामध्ये एक मोकळी जागा भाड्याने घेऊन तेथे हॉटेल चालवित आहे. या वर्षीच्या रमजान महिन्याचे हॉटेल चालू करायचे असल्याने त्यांनी पारगेनगर येथे जागा भाड्याने घेऊन तेथे शेड मारण्याचे काम करत होते. यावेळी अन्वर हा त्या ठिकाणी आला. भाईच्या परवानगीशिवाय तू मंडप का टाकलास, तुला ते जड जाईल, अशी धमकी देऊन भाईला भेटायला सांगितले. त्यामुळे फिर्यादी हे समीर पठाण याच्या ऑफिसमध्ये गेले. तेव्हा समीर पठाण याने तुझ्याकडे भरपूर पैसा आहे.
तु ३ लाख भाडे देऊ शकतोस. माझे नागरिक अधिकार मंच या संघटनेसाठी ५ लाख रुपये दे, म्हणाला. त्यानंतर ३ लाख रुपये खंडणी मागून फिर्यादी यांना शिवीगाळ केली. पैसे न दिल्यास तू ५ ते ६ महिने बाहेर फिरु शकणार नाहीस, अशी धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करीत आहेत.
तु ३ लाख भाडे देऊ शकतोस. माझे नागरिक अधिकार मंच या संघटनेसाठी ५ लाख रुपये दे, म्हणाला. त्यानंतर ३ लाख रुपये खंडणी मागून फिर्यादी यांना शिवीगाळ केली. पैसे न दिल्यास तू ५ ते ६ महिने बाहेर फिरु शकणार नाहीस, अशी धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment