नगरसेवकाचे अनधिकृत बांधकामाची बातमी प्रकाशित केल्याने पत्रकाराला धमकी
पुणे माझा न्युज : प्रतिनिधी :- कोंढवा परिसर हा नेहमी चर्चेचा विषय बनला आहे या ठिकाणी अनेक अनधिकृत बांधकाम आणि नगरसेवकांवर वीजचोरी चे गुन्हे अशा प्रकारचे रोज काही न काही बातम्या समोर येत आहेत त्यातच गफूर पठाण यांनी निवडणूक देखील खोटे जात प्रमाण पडताळणी दाखवून निवडणूक जिंकून आले होते परंतु यावर वडार समाजाने देखील आक्षेप घेतला आहे आणि आता या महाशयाचा एक नवीन प्रकार म्हणजे कोंढवा परिसरात राहणारे समाज सेवक असलम इसाक बागवान यांनी यांच्या विरोधात ३०० झाडे कापली तसेच अनधिकृत पणे भैरोबा नाला येथे सिमेंट पाईप टाकून धोकादायक पूल बांधल्याने तेथील नागरिकांचे प्राण धोक्यात घालण्याचा प्रकार या महाशयांनी केला या बाबत याची बातमी आपल्या न्यूज पोर्टल वर प्रकाशित झाल्यामुळे लोकांसमोर सत्यता समोर आल्याने माजी नगरसेवक यांनी पत्रकारास धमकी दिली कि, ''तू बातमी का लावलीस याआधी पण तू बातमी लावलीस होतीस मला न विचारता आता लय झाले बघतो तुला'' असे म्हणून पत्रकारास धमकी दिली
त्याचबरोबर समाजसेवक असलम इसाक बागवान यांनी या गोष्टीचा पाठपुरावा करत असताना त्यांच्यावर सावरकर भवन समोर काही गुंडांमार्फत त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला त्यांना जिवे मारण्याच्या इराद्याने माजी नगरसेवक गफूर पठाण यांच्याकडून सुपारी गुंडा मार्फत हा हल्ला करण्यात आल्याचे समजले
या सर्व हल्लेखोरांच्या विरोधात असलम इसाक बागवान यांनी शिवाजी नगर पोलीस ठाणे येथे तसेच पत्रकार रियाज मुल्ला यांनी कोंढवा पोलीस ठाणे येथे तक्रार दिली असून दोन्ही ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबात लवकरच कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार असून पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केंद्रीय पत्रकार संघातर्फे केली जात आहे गफूर पठाण व त्यांच्या नातेवाईकांवर अनेक गुन्हे दाखल असून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाईची मागणी कोंढवा नागरिकांकडून करण्यात येत आहे
ज्या प्रमाणे दाभोळकर, कलबुर्गी, गौरी लंकैश या समाजसेवक व पत्रकार यांचा खून करण्यात आला आणि त्याचा आवाज दाबण्यात आला असाच प्रकार आज घडलेला असून सत्तेने माजलेल्या गफूर पठाण व सुपारी गुंडावर भारतीय दंड संहिता प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी कोंढवावासीयांकडून केली जात आहे
या बरोबरच पत्रकार रियाज मुल्ला यांनी या प्रकरणाची सत्यता जनतेपर्यंत बातमीच्या माध्यमातून प्रसिद्ध केली म्हणून नगरसेवक गफूर पठाण व त्यांच्या साथी दारांनी हे पत्रकारास धमकी देत आहेत आज या प्रकारामुळे पत्रकार रियाज मुल्ला यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे
असे अनेक प्रकार नगरसेवकाने सत्तेचा वापर करून केलेले आहेत त्यातील महत्वाचे पुणे मनपा ची विजचोरी, अनधिकृत बँनरबाजी, कोविडचे नियम मोडून साजरा केलेले वाढदिवस, तसेच जातीचा खोटा पुरावा देवून केलेली जनतेची व पुणे महानगरपालिका यांची केलेली फसवणूक याबाबत कोंढवा परिसरात नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे
या हल्ल्याच्या निषेधार्त तसेच पत्रकारास धमकी दिल्या कारणाने उद्या सोमवार दिनांक २७ जून २०२२ रोजी दुपारी १:३० वा. निषेध रॅली चे आयोजन करण्यात आले असून हि रॅली गफूर पठाण ज्या वॉर्डातून निवडून आले त्या वॉर्डातून म्हणजेच डी. एड कॉलेज पासून ते शीतल पेट्रोल पंप पर्यंत हि रॅली काढण्यात येणार आहे
No comments:
Post a Comment