पुणे माझा न्युज : प्रतिनिधी खालिद शेख - पुणे शहारत चोरीचे प्रमाण वाढतच आहे अश्यात पोलिसांवर कामाचे ताण वाढताना दिसत आहे काही दिवसापूर्वी भैरवनगर धानोरी येथील घरातुन एकुण २ किलो ८१ ग्रॅम ८५०/- मिली ग्रॅम सोन्याचे दागीने चोरी झाले बाबत विश्रांतवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात होता त्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाने एक पथक तयार करण्यात आले सदर पथकातील पोलीस अंमलदार दिपक चव्हाण, प्रफुल मोरे, संदिप देवकाते व शेखर खराडे यांनी गुन्हा घडल्यापासून अगोदरचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता सदरचे आरोपी हे तीन दिवसापासून रेकी करत असल्याचे दिसून आले सदरचे सीसीटीव्ही फुटेज हे फिर्यादी यांना दाखविले असता त्यांनी त्यातील मुकेश गोमाराम चौधरी रा. राजस्थान यास ओळखून माझे दुकानात काम करत असून तो दि. १०/१२/२०२१ रोजी पासून सुट्टीवर गावी राजस्थान येथे गेला असल्याबाबत सांगीतले.
त्यानंतर तांत्रीक तपासाच्या व गुप्तबातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने मा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक लहु सातपुते यांचे नेतृत्वात पोहवा दिपक चव्हाण, यशवंत किर्वे व पोलीस अंमलदार संदिप देवकाते, प्रफुल मोरे यांचे पथक तयार करून राजस्थान येथे आरोपीचा शोध घेणे कामी रवाना केले. नमुद तपास पथकाने अहोरात्र परिश्रम घेवून आरोपींचा तांत्रीक तपासामध्ये मिळेल त्या लोकेशनवर व बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सतत मागोवा घेवून आरोपी नामे १) मुकेश गोमाराम चौधरी वय २२ वर्षे, रा. गाव खुडाला फालना, ता. बाली जि. पाली, राज्य राजस्थान २) रमेश रामलाल चौधरी चय २७ वर्षे, रा. खुडाला, ता. बाली, जि. पाली, राजस्थान ३) भगाराम गोमाराम चौधरी वय ३८ वर्षे रा. खुडाला, ता. बाली, जि. पाली, राज्य राजस्थान ४) जेठाराम कृष्णाजी चौधरी ३८ वर्षे रा. खुडाला ता. बाली, जि. पाली, राज्य राजस्थान यांना अटक केली आहे. सदर गुन्हयामध्ये एका विधीसर्धीत बालक याचाही सहभाग असून त्यांचे कडून एकुण १ किलो ४०६ ग्रॅम ९४० मिली ग्रॅम सोन्याचे दागीने हस्तगत केले आहेत. दाखल गुन्हायाचा तपास पोउनि लहु सातपुते हे करत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. रोहीदास पवार, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४. पुणे शहर, मा. श्री रमेश गलांडे, सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे, मा. श्री. अजय चांदखेडे, वपोनि विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे, विजयकुमार शिंदे, पो. नि. गुन्हे, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी श्री लहु सातपुते, पोलीस उप निरीक्षक, पो.हवा. विजय सावंत, दिपक चव्हाण, यशवंत किर्वे, पोलीस अंगलदार संदिप देवकाते, प्रफुल मोरे, शेखर खराडे, योगेश चांगण, शिवाजी गोपनर व श्याम शिंदे (तांत्रीक विश्लेषन विभाग परिमंडळ ४, पुणे शहर) तसेच विशेष पोलीस अधिकारी राज राठोड (पी ४, महाराष्ट्र राज्य)
No comments:
Post a Comment