पुणे माझा न्यूज प्रतिनिधी गफूर शेख पुणे : येरवडयातील सॉफ्टवेअर कंपनीतील तब्बल ७० लाख रुपयांचे नेटवर्किंगचे साहित्य चोरणारे चोरटे २४ तासाच्या आत जेरबंद एच.एस.बी.सी. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंडिया प्राथक्हेट लिमिटेड कल्याणीनगर पुणे या कंपनीत नेटवर्क इंजिनियर म्हणुन काम करणारे श्री. मकरंद मधुकर बेलुलकर, रा. आंबेगाव बुदक, कात्रज, पुणे. यांनी दि. १५/०२/२०२१ रोजी त्यांचे कंपनीतील ७० लाख रुपयांचे वायफाय ऍक्सेस पॉईट व ऍक्सेस स्विच चोरी झालेबाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने गु. रजि. नं. १०१/२०२१ भा. दं. वि. कलम ३८०.४११,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता
दाखल गुन्हयाचा तपास करत असताना संशयित आरोपी नामे गणेश धोंडीराम डोलारे, रा. नवले हॉस्पिटलजवळ, सिंहगड रोड, नहे. पुणे. यास ताब्यात घेऊन त्याचेकडे तपास करता त्याने सदर कंपनीतील वायफाय ऍक्सेस पॉईट व ऍक्सेस स्विच चोरल्याचे कबुल करुन ते बांद्रा मुंबई येथे राहणारा कुलदिप चौहान यास विकले बाबत सांगितल्याने मा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युनूस शेख यांचे आदेशान्वये तपास थिक प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. समीर करपे, पोलीस नाईक किरण घुटे, अमजद शेख, नवनाथ मोहिते, मनोज कुदळे यांनी
बांद्रा मुंबई येथे जावुन कुलदिप चौहान याचा शोध घेवुन त्याच्याकडुन गुन्हयातील चोरीस गेलेला कि. रु. ५२ लाख ५० हजार रुपयांचे नेटवर्किंगचे साहित्य हस्तगत केले आहे. नमुद गुन्हयात आरोपी नामे १) गणेश धेंडीराम डोलारे, वय ३१ वर्षे, रा. अरविंद हाईट्स, जाधवर कॉलेजजवळ, नव्हे, पुणे २) कुलदिप रामकरन चौहान, वय ३३ वर्षे, रा.प्लॉट नं. १३३, गणेश मंदिर, डायमा रोड, खेरवाडी, बांद्रा ईस्ट, मुंबई यांना अटक करण्यात आली असुन त्यांचेकडे अधिक तपास चालु आहे.सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त श्री नामदेव चव्हाण सो, मा. पोलीस उप आयुक्त सो परि ४ श्री. पकंज देशमुख साो, येरवडा विभागाचे प्रभारी मा. सहा, पोलीस आयुक्त श्री. किशोर जाधव, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख साो, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री अजय वाघमारे सा. यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा, पोलीस निरीक्षक श्री समीर करपे, पो. हवा. गणपत थिकोळे पोलीस नाईक दत्ता शिंदे, तुषार खराडे, अमजद शेख, नवनाथ मोहिते, मनोज कुदळे, किरण घुटे, गणेश वाघ, पोलीस अंमलदार अनिल शिंदे, सुनिल नागलोत, सुनिल सकट, राहुल परदेशी, अजय पडोळे, समीर भोरडे, संजय भरगुडे यांनी केली असुन पुढील तपास श्री. समीर करपे, सहायक पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.
Nice
ReplyDelete