तडका फडकी बदली थांबवा - इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे पुणे पोलीस आयुक्त मा.अभीनव गुप्ता यांना निवेदन
पुणे माझा न्युज प्रतिनिधी : इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे असलम इसाक बागवान यांनी विविध भागात
आपल्या संस्थेच्या मार्फत समाज सेवा करत आले आहेत तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे काम देखील
त्यांनी केले त्याच बरोबर सतत नागरिकांच्या हितासाठी ते लढा देत असत त्यांची ख्याती आपणा सर्वांनाच परिचीत
आहेच या भागातील कोंढवा पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांची तडका फडकी
बदली चे आदेश आले असता पुणे पोलीस आयुक्त मा.अभीनव गुप्ता यांची भेट घेतली.
कोंढवा भागातील कोंढवा पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड हे येथे सदारणतः जानेवारी मध्ये बदली होऊन आले.
त्याच्या कर्तव्य दक्ष, सामजस्य, मनमिळाऊ वृत्तीने काही दिवसातच कोंढवा भागातील जनतेचा विश्वास संपादन केला, तसेच गुन्हेगारीला आळा घातला
या क्षेत्रात शांतता, एकता -भाईचारा निर्माण करून साहेबांनी सर्वांची मने जिंकली.
अशा व्यक्तीची या भागाला गरज असताना त्याची अचानक बदली केली गेली,
कारण काही असो परंतु गायकवाड साहेबाची बदली होऊ नये म्हणुन इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे आज पुणे पोलीस आयुक्त मा. अभीनव गुप्ता साहेब
यांना नगरसेवक हाजी गफूर पठाण, माजी नगरसेवक रईस सुंडके, हाजी फिरोज शेख, इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप चे पदाधिकारी तसेच इतर सामाजिक संस्था यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान,
सचिश अल्लाट कुमेल रजा समीर पठाण बाजिदशेख उपस्थित होते
No comments:
Post a Comment