PIMPARI-CHINCHWAD : चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त कोकणी माणसाला आमदार लक्ष्मण जगताप यांचा मदतीचा हात - PUNE MAJHA NEWS

Breaking

Post Top Ad

 


Friday, 26 June 2020

PIMPARI-CHINCHWAD : चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त कोकणी माणसाला आमदार लक्ष्मण जगताप यांचा मदतीचा हात




पुणे माझा न्युज  –
चक्रीवादळामुळे आभाळ कोसळलेल्या कोकणातील उद्ध्वस्त नागरिकांच्या मदतीला आमदार लक्ष्मण जगताप धावून गेले आहेत. आमदार लक्ष्मण जगताप, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि युवा विकास ट्रस्टच्या वतीने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे कोरोनाचे संकट असल्यामुळे तेथील नागरिकांना आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.







कोकण किनारपट्टीला नुकतेच धडकून गेलेल्या चक्रीवादळाने कोकणी माणसाचे जीवन उद्ध्वस्त झाले. तेथील नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप धावून गेले आहेत. चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनला मोठा फटका बसला. या भागातील नागरिकांना आमदार लक्ष्मण जगताप, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि युवा विकास ट्रस्टच्या वतीने अन्नधान्याची मदत देण्यात आली. मदत नव्हे कर्तव्य या भावनेतून नागरिकांना ही मदत करण्यात आली. त्याचप्रमाणे कोरोनाचे संटक पाहता तेथील नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.




यावेळी युवा विकास ट्रस्टचे अध्यक्ष अनिल कांबळे, शंकर सुतार, विशाल गायकवाड, मंगेश माने, सोनू दुधभाते, लोरेन्स लाजूसकर, निलेश परीट, रवी लांघी, गणेश पुसाळकर या सर्वांनी श्रीवर्धनमध्ये जाऊन तेथील नागरिकांना मदतीचा हात दिला.

No comments:

Post a Comment

Post Top Ad