पुणे माझा न्युज प्रतिनिधी । प्रशांत व्यवहारे : आज पहाटे 5:30 वा.चे सुमारास फिर्यादी ह्या रस्त्याने पायी चालत मॉर्निंग वाँक साठी जात असताना एका मोटरसायकल वरील आज्ञात आरोपी याने फिर्यादी जवळ जावुन थांबवुन कोयत्याचा धाक दाखवुन फिर्यादी चे अंगावरील सोने व रेडमी कंपनीचा मोबाईल असा किंमत रु 1,26,000/-चा माल जबरीने घेऊन त्याचेकडील मोटारसायकल वरून पळून गेलेबाबत शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत राज्य मार्गावर होणा-या जबरी चोरी व गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अटक करणेकामी मा. डॉ. अभिनव देशमुख सो,पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिला होता.
आज रोजी वरिष्ठ पो.नि. श्री.अशोक शेळके स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा पुणे ग्रा. यांचे आदेशाने एलसीबी चे पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना तांत्रिक तपासावरून व गुप्त बातमीदाराकडून सदरच्या गुन्ह्यातील मोबाईल हा संशयित ईसम नामे तुळशीदास उर्फ मुकेश मोहन गर्जे वय 24 राहणार राजेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर हा वापरत असले बाबत गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून त्यास शिताफीने ताब्यात घेतले त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता, त्यांने सदर च्या गुन्ह्यातील चोरीस गेलेला रेडमी कंपनीचा मोबाईल फोन वापरत असल्याचे सांगत आहे सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी शिरूर पोस्टे चे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कामगिरी डॉ. अभिनव देशमुख,पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण.,मा. मिलिंद मोहीते,अपर पोलीस अधीक्षक, बारामती ,मा. राहुल धस,उपविभागीय पोलिस अधिकारी दौंड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहा.पोलीस निरीक्षक सचिन काळे, सहा.फौज तुषार पंदारे, पो. हवा जनार्दन शेळके, पो.हवा राजू मोमीन, पो.हवा अजित भुजबळ, पोना मंगेश थिगळे, पो.ना योगेश नागरगोजे सहा.फौज. मुकुंद कदम यांनी केली आहे
No comments:
Post a Comment