पुणे माझा प्रतिनिधी पुणे : पुण्यातील शहा पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा प्रयत्न फसला,त्यांच्या कडून पिस्तूल, गावठी कट्टा, एअरगन आणी कोयता असा १ लाख ७ हजारांचा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला.
अटक केलेल्या आरोपींची नावे
अमेय सुधाकर मारणे २५ रा.दांडेकरपूल, मंदार श्रीधर दारवटकर २४, जयेश लक्ष्मण भुरुक २२, ऋतीक संभाजी वाघमारे २१, सर्व रा.वडगाव बुद्रुक आणी राहुल मच्छिंद्र कांबळे २२,रा.सिंहगड रस्ता अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरुन मंगळवारी दुपारी आरोपींना वडगाव बुद्रुक येथे एका मंदिरामागील झाडीत छापा टाकून पकडले.
यावेळी त्यांचा एक साथीदार मोन्या विकारे रा.बिबवेवाडी हा पळून गेला. यातील सर्व आरोपी रेर्कार्डवरील गुन्हेगार आहेत. अमेय मारणेवर खुनाचा, खुनाच्या प्रयत्नाचा व शस्त्र बाळगल्याचा एक असे तीन गुन्हे दाखल आहेत.
तर राहुल कांबळे याच्याविरुध्द दत्तवाडी व सिंहगड रोड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाचा व जबरी चोरीचा असे दोन गुन्हे,
व जयेश भुरुकवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात जबरी चोरी, शस्त्र बाळगणे, विनयभंग असे तीन तर,मंदार दारवटकर विरुध्द सिंहगड रोड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व शस्त्र बाळगण्याचा एक असे दोन गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ च्या पथकाने केली आहे.
No comments:
Post a Comment